शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

दहा दिवसांनंतर जिल्ह्याला मिळाली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:19 IST

नाशिक : गेल्या ४ ऑगस्टला जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४८ हजार लसींच्या डोसनंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्ह्यासाठी ९५ हजार इतक्या ...

नाशिक : गेल्या ४ ऑगस्टला जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४८ हजार लसींच्या डोसनंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्ह्यासाठी ९५ हजार इतक्या लसींचा साठा उपलब्ध झाला असल्याने, जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५९१ लसीकरण केंद्रांवर लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे वाटप केले जाणार आहे. कोविशिल्डचे ८८ हजार तर कोव्हॅक्सिन ७ हजार ४०० डोसेस प्राप्त झाले आहेत.

केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लसींचे डोस प्राप्त होत नसल्याने डोससाठी वाट बघावी लागत असल्याने, त्याचा परिणाम लसीकरणावरही होत आहे. जिल्ह्यातील साठा दोन दिवसांपूर्वीच संपल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लसीकरणही ठप्प झाले होते. त्यामुळे अधिक लसींची आवश्यकता असतांनाच जिल्ह्यासाठी तब्बल ९५ हजार इतके लसींचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा लसीकरणाला गती मिळणार आहे. दरम्यान, जिल्ह्याला आजवर प्राप्त झालेल्या लसींच्या आधारे २० लाखांच्या पुढे लसीकरण करण्यात आलेले आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून जिल्ह्यात जास्तीतजास्त लसीकरण करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. कोरोनाची लाट रोखून धरण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्यामुळे त्या दृष्टीने लसीकरण वाढविले जात आहे. त्यासाठी सातत्याने केंद्राकडे मागणी नोंदविली जात आहे. जिल्ह्याने आतापर्यंत २० लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. त्यात १४ लाख ८९ हजार ४४‍१ नागरिकांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे, तर ५ लाख १९ हजार नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. एका दिवसात ४४ हजार नागरिकांचे लसीकरण हा जिल्ह्याचा विक्रम आहे. हा विक्रम मागे टाकण्यासाठीचे नियोजनही केले जात आहे.

नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीत १८२ केंद्रे असून, त्यामध्ये सरकारी आणि सेवाभावी संस्थांची केंद्रे आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक ३८५ तर मालेगाव मनपा हद्दीत २४ लकीकरण केंद्रांवर लसपुरवठा केला जात आहे. लसीकरणाला गती मिळावी, यासाठी २६ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रशासनाने परवानगी दिली असून, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण केले जात आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनसोबत रशियाची व्ही.स्पुतनिक ही लसही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तूर्तास स्पुतनिक ही लस चार खासगी रुग्णालयांतून दिली जात आहे.