धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जीवावर बेतू शकतो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:25+5:302021-09-13T04:13:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पावसाळी पर्यटनाला वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी ...

धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जीवावर बेतू शकतो!
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पावसाळी पर्यटनाला वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी विशेषता धरण आणि धबधबा असेल त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे मात्र त्याच वेळेस धबधब्याजवळ जाऊन किंवा नदीपात्रात सेल्फी घेण्याचा मोह जीवावर बेतू शकतो याबाबत काळजी घेण्याची गरज आहे नाशिक जिल्ह्यात अशा अनेक घटना यापूर्वी घडलेले आहेत. त्यामुळे आता पर्यटन करा मात्र जपून असे सांगण्याची वेळ आली आहे.
इन्फो
पर्यटनाला जा पण काळजी घ्या
१ सोमेश्वर धबधबा
नाशिक शहरातच गोदावरी नदीवर असलेला सोमेश्वर धबधबा हा पर्यटकांची पहिली पसंती आहे शहरातच असल्याने अवघ्या चार पाच किलोमीटर अंतरावर हा धबधबा बघण्यासाठी पावसाळ्यात गर्दी होती या धबधब्याच्या बाजूला सुरक्षाकडे मोडकळीस आले आहेत. त्यातच पावसाळ्यात नदीपात्राचा प्रवाह सोडून कठड्यांवरून हा धबधबा वाहत असतो त्यामुळे सेल्फी काढताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही
२ दुगारवाडी धबधबा-
नाशिक शहरापासून अवघ्या २८ किलोमीटर असलेल्या त्र्यंबकेश्वरजवळ दुगारवाडी हा धबधबा हे अत्यंत कठीण ठिकाणी आहे. डोंगर दरीतून त्या ठिकाणी पोहोचता येते मात्र बराचसा मार्ग नदीपात्रातून असल्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी सेल्फी घेताना अनेकांचा मृत्यू झाला आहे
३ भावली धरण-
इगतपुरी तालुक्यात अनेक धरणे असून दारणा, भावली मुकणे या परिसरात गर्दी होत असते. मात्र सध्या भावली धरण परिसर हा पर्यटकांच्या दृष्टीने हॉट स्पॉट ठरला आहे या ठिकाणीदेखील सेल्फी घेताना काळजी घेण्याची गरज आहे अन्यथा जीवावर बेतू शकते.
इन्फो
धोक्याची सूचना देणारे कोणीच नाही
- शहराजवळील गंगापूर धरण असो अथवा जिल्ह्यातील अन्य धरणे या ठिकाणी पर्यटकांना आवर घालण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसतात.
- पर्यटन महामंडळ आणि वन खाते तसेच अन्य शासकीय यंत्रणांनी अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती असल्याचे फलक लावले आहेत मात्र त्याचे पालन करताना कोणी आढळत नाही तसेच शिस्त लावण्यासाठी कर्मचारी नसतात.