धोंडगव्हाण शिवारात टेम्पोभर चारा जळून खाक
By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:52+5:302016-01-25T22:51:52+5:30
धोंडगव्हाण शिवारात टेम्पोभर चारा जळून खाक

धोंडगव्हाण शिवारात टेम्पोभर चारा जळून खाक
वडनेरभैरव : जनावरांचा चारा घेऊन जाणाऱ्या आयशर गाडीला धोंडगव्हाण (ता. चांदवड) येथील वस्तीजवळ प्रमाणापेक्षा खाली असलेल्या रस्त्यावरील विद्युततारांचा धक्का लागल्याने चाऱ्याने पेट
घेतला.
ही बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्याने मोकळ्या जागी गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे गाडी गावातील भर वस्तीत जाऊन बंद पडली. यावेळी शेकडोच्या संख्येने जमा झालेल्या ग्रामस्थांनी बंद पडलेली गाडी वस्तीतून बाहेर काढून जवळ असलेल्या शेतात नेली. त्याठिकाणी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आग आटोक्यात येत नसल्याने अखेर पिंपळगाव बसवंत येथून अग्निशामक दलाचा बंब आणून आग विझविण्यात आली. यात टेम्पोतील सर्व चारा जळून खाक झाला. आग विझविण्याकामी ग्रामस्थ अशोक तिडके, रघुनाथ पवार, शरद शिंदे, संदीप शिंदे, किरण तिडके, योगेश सुगंध, बाळू शिंदे आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)