श्रमिकनगरला टेम्पोची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST2021-02-14T04:14:25+5:302021-02-14T04:14:25+5:30

श्रमिकनगर येथे नगरसेविका हेमलता कांडेकर यांचे संपर्क कार्यालय आहे. कार्यालयाजवळच श्याम शेलार राहतात. शेलार यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या मालकीचा टेम्पो ...

Tempo sabotage to Shramiknagar | श्रमिकनगरला टेम्पोची तोडफोड

श्रमिकनगरला टेम्पोची तोडफोड

श्रमिकनगर येथे नगरसेविका हेमलता कांडेकर यांचे संपर्क कार्यालय आहे. कार्यालयाजवळच श्याम शेलार राहतात. शेलार यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या मालकीचा टेम्पो (एम.एच.१५ डी.के.६७९२) त्यांनी घराजवळ उभा केला असताना, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी टेम्पोची पुढील काच फोडून पोबारा केला. सकाळी शेलार यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी सातपूर पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे टेम्पोच्या शेजारी लावलेल्या रिक्षामधून टेपसुद्धा चोरीला गेल्याचे रिक्षा मालकाच्या लक्षात आले. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

यापूर्वी देखील हिंदी शाळेजवळ अज्ञात समाजकंटकांनी घरांवर दगडफेक केल्याचा प्रकार घडलेला आहे.याबाबत त्यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

---

फोटो आर वर १३टेम्पो नावाने सेव्ह आहे.

===Photopath===

130221\13nsk_22_13022021_13.jpg

===Caption===

तोडफोड केलेला टेम्पो

Web Title: Tempo sabotage to Shramiknagar