तोरंगण घाटात टेम्पो उलटून, २५ जखमी
By Admin | Updated: October 24, 2014 01:04 IST2014-10-24T00:45:19+5:302014-10-24T01:04:10+5:30
तोरंगण घाटात टेम्पो उलटून, २५ जखमी

तोरंगण घाटात टेम्पो उलटून, २५ जखमी
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर जवळील तोरंगण घाटात भांग्या देवाच्या पुढील वळणावर मजुरांनी भरलेला टेम्पो दरीत पलटी झाल्याने टेम्पोतील सुमारे २५ जण जखमी झाले.
काही मजुरांना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागेल असे डॉ. विठ्ठल काळे यांनी सांगितले. मोखाडा - जव्हार परिसरातील विविध वाड्या-पाडे येथील मजूर नाशिक येथे खडी फोडण्याच्या कामासाठी ४० कुटुंबे गेल्या वर्षभरापासून आले होते. सणासुदीसाठी हे सर्व मजूर आपापल्या घरी येत. असेच दिवाळी सणासाठी २० कुटुंबे घरी परतत होते. टेम्पो पलटी झाल्याने सुदैवाने ते वाचले. कोणी गंभीर जखमी झाले मात्र कुठलीही प्राणहानी झाली नाही.
सायंकाळी ४.३०च्या दरम्यान रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात येऊ लागल्या. प्रथम ३ रुग्णवाहिका जखमी रुग्ण घेऊन आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य गावांमधील रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. जवळपास वीसपर्यंत जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीना नाशिकला हलविण्यात आले. जखमींमध्ये देवीदास निवृत्ती वाघ (वय ४०, देहरा, जव्हार), हिरामण जानू वाघ (३०, देहरा, जव्हार), गंगाराम गोविंदा पवार (४०, शिवली, नांदगाव), जानकी गंगाराम पवार (५, शिवली नांदगाव), सुनील सोमा वाघ (२९, देहरा जव्हार), रामू जानू पवार ३५, जिवी रामू पवार (३०, देहरा जव्हार), बायडी किसन वळवी (१५ शिवली नांदगाव), रजी नवसु चेलम (४५, शिवली नांदगाव), रेखा राजू पवार (४५, शिवली नांदगाव), संतोष वसंत जाधव (३०), वसंत लक्ष्मण जाधव (४५), पिंटू रमेश पवार, लता चंद्रकांत दिवे ४५, सपना चंद्रकांत दिवे, संतू लखन जाखड ५० आदि जखमींचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलकुमार कुलथे, डॉ. विठ्ठल काळे, स्टाफ नर्स श्रीमती कुलथे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्व जखमींवर उपचार केले.
मोखाडा पोलीस हद्दीत अपघाताची जागा असल्याने मोखाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. हे सर्व मजूर नाशिक येथील ठेकेदार बिरजू जाधव यांच्याकडे काम करीत असल्याचे मजूर व त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्याच टेम्पोने हा अपघात घडल्याचे व चालक रामकिसन घोटे टेम्पो सोडून फरार झाल्याचे जखमींनी
सांगितले. (वार्ताहर)
भांग्या देवाच्या पुढील ठाणे हद्दीतील हे वळण धोकेदायक असून, या ठिकाणी वारंवार अपघात होतात. असे या भागातील लोक सांगतात. सा.बां. विभाग ठाणे यांनी हा भाग रुंद करावा व धोकेदायक वळण काढावे अशी मागणी या भागातील लोकांनी अनेकवेळा केली आहे.