गोंदे फाटा येथे महामार्गावर टेम्पो उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:56+5:302021-08-15T04:17:56+5:30
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून मुंबईकडे टेम्पो (क्र. एमएच ४६ एएफ २६८७) जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो दुभाजक तोडून ...

गोंदे फाटा येथे महामार्गावर टेम्पो उलटला
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून मुंबईकडे टेम्पो (क्र. एमएच ४६ एएफ २६८७) जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो दुभाजक तोडून विरुध्द दिशेला जाऊन महामार्गावर उलटला. टेम्पोचालक गाडीतच अडकला होता. अपघाताचा आवाज ऐकून जवळच असलेल्या नागरिकांनी धाव घेऊन चालकास बाहेर काढले.
परिसर हा गोंदे औद्योगिक वसाहतींमध्ये असल्यामुळे यावेळी येथे कामगारांची वर्दळ असते. तसेच महामार्गाच्या बाजूला व्यावसायिकांची दुकाने तसेच जवळच पेट्रोलपंप होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. इतर कोणतेही नुकसान झाले नाही. काही वेळातच क्रेनच्या सहाय्याने टेम्पो उभा करून चालक मुंबईकडे रवाना झाला.
(१४ नंदूरवैद्य)
गोंदे दुमाला येथे नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो उलटला.
140821\14nsk_39_14082021_13.jpg
गोंदे दुमाला येथील नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी झाल्यामुळे टेम्पोची झालेली अवस्था.