शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

लाखोच्या मालाच्या लाकडाचा तस्करी करतांना लाकडासह टेम्पो जप्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 16:19 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल परिसरातील चिंच ओहळ, देवडोंगरा, ओझरखेड या गुजरात सीमेवरील परिसरात घनदाट जंगलात खैर साग या लाकडांची तस्करी होत असते. या झाडांची चोरटी व अवैध वाहतुक होत असते. दि.18 रोजी गुप्त खबर मिळाल्या वरुन वन अधिकारी व कर्मचा-यांनी जीवाची बाजी लाउन सिने स्टाईल थरारक पाठलाग करुन चोरटा मालासह टेम्पो पकडले.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी या कामी जीवाची बाजी लावुन यशसवी झाले.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल परिसरातील चिंच ओहळ, देवडोंगरा, ओझरखेड या गुजरात सीमेवरील परिसरात घनदाट जंगलात खैर साग या लाकडांची तस्करी होत असते. या झाडांची चोरटी व अवैध वाहतुक होत असते. दि.18 रोजी गुप्त खबर मिळाल्या वरुन वन अधिकारी व कर्मचा-यांनी जीवाची बाजी लाउन सिने स्टाईल थरारक पाठलाग करुन चोरटा मालासह टेम्पो पकडले.त्र्यंबकेश्वर तालुक्याचा पश्चिम भाग गुजरात सरहद्दी पर्यंत हा परिसर विविध वृक्षराजींनी बहरलेला आहे. विविध प्रकारचे वृक्ष या परिसरात आढळतात. घनदाट जंगल असल्याने याचा फायदा घेऊन या परिसरातून, खैर, साग, आदी लाकडांची चोरटी अवैध वाहतूक केली जाते.याचा प्रत्यय 18 ऑक्टो. रोजी एक थरारक पाठलाग करुन अधिकारी व वन कर्मचा-यांना आलामिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (दि.18) रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास चिंच ओहळ वन परिमंडळ विभागातून लाकडाची चोरटी तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वन विभागास मिळाली. नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगा पाडा या ठिकाणी सापळा रचण्यात आला. अधिकारी व वन कर्मचारी हे दबा धरून बसले होते. या सुमारास टाटा 407 वाहन क्र. ॠख 17 ळ 7606 हा टेम्पो रस्त्यावरून येत असतांना वन अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर वाहनाने चकमा देत अति वेगाने पुढे पळविले. वन कर्मचारी व अधिकारी यांनी त्वरीत पाठलाग सुरू केला.सोळा किलोमीटर अंतर पाठलाग केल्यावर त्यांनी वाहन पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे जंगलात पसार झाले. सदर गाडीची तपासणी केली असता त्यात अंदाजे सव्वा लाख किमतीचे खैराचे लाकूड व एक लाख पन्नास हजार रुपयांचा टेम्पो असा एकुण दोन लाख ७५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास नाशिक उपवन संरक्षक पंकज कुमार गर्ग, वनक्षेत्रपाल हरसुल विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी रघुनाथ कुवर करीत आहे. मोहन पवार, कैलास पवार, वनरक्षक किरण गवळी, राजेंद्र चौधरी, उमेश भोये, वाहन चालक संजय बघरें, वनमजुर पोपट राऊत व इतर कर्मचाऱ्यांनी या कामी जीवाची बाजी लावुन यशसवी झाले. 

टॅग्स :forestजंगलCrime Newsगुन्हेगारी