शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर ठरतेय शिवप्रेमींचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:39 IST

उत्तर महाराष्ट्राचं हे एकमेव छत्रपतींचे मंदिर आहे....

संदीप झिरवाळ

नाशिक  : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हे तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस त्यांना ईश्वरासम पूजतो. त्यामुळे नाशिक मध्ये २१ वर्षांपूर्वी दिंडोरी रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे. दररोज शेकडो नागरिक येथे दर्शनाला जातात उत्तर महाराष्ट्राचं हे एकमेव छत्रपतींचे मंदिर आहे.

आम्ही राजेंना देवरूपात बघतो म्हणूनच नित्य नियमाने त्यांना भजतो आणि पूजतो, अशी भावना दिंडोरी रोडवर आरटीओ कॉर्नरनजीक स्थापनकेलेल्या ‘शिवराम’ मंदिरात दैनंदिन दर्शनासाठी जाणारे शिवप्रेमी आदराने व्यक्त करतात. २१ वर्षांपूर्वी १९ जानेवारी २००२ रोजी प. पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या संकल्पनेतून परिसरात शिवराम मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील पहिले मंदिर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात दरवर्षी शिवजयंतीला दुग्धाभिषेक, होम हवन करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले जाते. मंदिरात पंचधातूपासून तयार केलेली शिवरायांची २५० ते ३०० किलो वजनाची मूर्ती असून, ती औरंगाबाद येथून तयार करून त्यावेळी विधिवत संस्कार करून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व राम म्हणजे रामचंद्र पारनेरकर म्हणून मंदिराचे ‘शिवराम’ नामकरण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीशेजारी रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर यांची संगमरवरी मूर्ती आहे, याशिवाय मंदिरात गुरुदेव दत्त, गणपती, महादेव, हनुमान, तुळजाभवानी यासह संत तुकाराम आणि समर्थ रामदास महाराज यांच्यादेखील मूर्ती आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत पहिले मंदिर म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराम मंदिराची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. छत्रपती शिवरायांनादेखील देवाचा अवतार मानले जात असल्याने मंदिरात दैनंदिन सकाळीवैदिक पद्धतीने आरती, पूजन केले जाते. शिवजयंतीच्या दिवशी मुख्य मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत अभिषेक करून दुग्धाभिषेक केला जातो. शिवाजी महाराजांच्या मंदिरात राजेश कुलकर्णी दैनंदिन पूजा विधीचे काम बघतात. या मंदिरात शिवप्रेमी दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी हजेरी लावून महाराजांच्या मूर्तीचे पूजन करतात, तर वर्षभरात अनेक शिवप्रेमी मंदिर बघण्यासाठी येतात. मंदिराच्या वर्धापन दिन निमित्ताने दरवर्षी मंदिराची रंगरंगोटी, तसेच डागडुजीचे कामदेखील केले जाते. याशिवाय वर्धापनाच्या दिवशी विविध कार्यक्रमांचेदेखील आयोजन केले जाते.

टॅग्स :NashikनाशिकPuneपुणेShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज