शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

तापमान १२.७ अंशावर; कडाक्याच्या थंडीपासून तुर्तास दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 16:41 IST

मकरसंक्रांतीला शहराचे किमान तापमान १३.४, तर कमाल तापमान २५.९ अंशावर होते; मात्र दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पारा थेट ९.८ अंशावर घसरला. थंडीची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी (दि.१७) शहराचे किमान तापमान ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले.

ठळक मुद्देरविवारी शहराच्या किमान तापमानात ५ अंशांनी वाढ वातावरणातील गारठा कमी होण्यास मदत झाली

नाशिक : मकरसंक्रांतीनंतर अचानकपणे पारा कमालीचा घसरल्याने मागील चार दिवसांपासून नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत होता; मात्र रविवारी शहराच्या किमान तापमानात ५ अंशांनी वाढ झाली. सोमवारी १२.७ अंशापर्यंत पारा वर सरकल्याने थंडीच्या कडाक्यापासून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.मकरसंक्रांतीला शहराचे किमान तापमान १३.४, तर कमाल तापमान २५.९ अंशावर होते; मात्र दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पारा थेट ९.८ अंशावर घसरला तर कमाल तापमानातही तीन अंशांनी घट झाली. यामुळे थंडीची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी (दि.१७) शहराचे किमान तापमान ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले. चालू हंगामातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद शुक्रवारी झाली. शनिवारी अंशत: वाढ होऊन पारा ७.८ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे थंडीचा कडाका वातावरणात कायम होता. निफाडमध्ये सर्वाधिक २.८ अंशापर्यंत पारा घसरल्याने दवबिंदूचा बर्फ झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. शनिवारपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील गारठा कमी होण्यास मदत झाली. किमान तापमानाचा पारा थेट ११अंशांपर्यंत वर सरकला आणि कमाल तापमान २७ अंशांपर्यंत पोहचले.एकूणच मागील चार दिवसांत नाशिककरांना अक्षरक्ष: थंडीचा कहर अनुभवयास आला; मात्र रविवारी थंडीची तीव्रता कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे नाशिककरांनी रविवारची सुटी संध्याकाळी उशिरापर्यंत बाहेर घालविली. शहरातील बाजारपेठांसह कॉलेजरोड, गंगापूररोड या भागात खवय्यांची गर्दी पहावयास मिळाली. तसेच खरेदीसाठीदेखील नाशिककर कुटुंबासह बाहेर पडले. एकूणच थंडीचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम रविवारी संध्याकाळनंतर शहराच्या रस्त्यांवर पहावयास मिळाला.चार दिवसांपासून पहाटेच्या सुमारास जोरदार थंडी पडत असल्यामुळे सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे चित्र होते; मात्र रविवारी शहरातील जॉगिंग ट्रॅक काहीसे गजबजलेले दिसून आले. मात्र जॉगर्स नियमितपणे घराबाहेर पडले, ते संपूर्णता उबदार कपड्यांनी ‘पॅकअप’ करूनच. सर्दी-पडसे, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी मात्र या चार दिवसांमध्ये वाढल्याचे शहरातील डॉक्टरांनी सांगितले.शहराचे किमान तापमान असे...सोमवारी (दि.१३) १५.५मंगळवारी (दि.१४) १५.०बुधवारी (दि.१५) १३.४गुरुवारी (दि.१६) ९.८शुक्रवारी (दि.१७) ६.०शनिवारी (दि.१८) ७.८रविवारी (दि.१९) ११

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिकTemperatureतापमान