शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

...सांगा भ्रष्टाचाराची तक्रार करायची तरी कोणाकडे अन् कशी?

By विजय मोरे | Updated: November 17, 2018 17:48 IST

नाशिक : पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासुरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्तावसुली त्याच्या शिक्षकी मनाला रुजली नाही़ त्याने या हप्तावसुलीचे व्हिडीओ रेकॉर्डींग करून ते सोशल मीडीयावर व्हायरल केले अन् पोलिसांचा चेहरा समोर आणला़ मात्र, भ्रष्टाचाराविरोधात लढणाºया या शिक्षकावर पोलिसांबाबत तक्रार करतो या कारणावरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी थर्ड डिग्री वापरली़ एकिकडे पोलीस अन् दुसरीकडे गुंड यांच्या कात्रीत या शिक्षकाचे कुटुंबिय सापडले असून पिडीत शिक्षकाने विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवदेन दिले आहे़

ठळक मुद्दे एसीबी अन् पोलीसांकडून तक्रारदार असुरक्षितहप्तेखोर पोलिसांचा पर्दाफाश करणा-यो शिक्षकाचा सवाल

नाशिक : पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासुरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्तावसुली त्याच्या शिक्षकी मनाला रुजली नाही़ त्याने या हप्तावसुलीचे व्हिडीओ रेकॉर्डींग करून ते सोशल मीडीयावर व्हायरल केले अन् पोलिसांचा चेहरा समोर आणला़ मात्र, भ्रष्टाचाराविरोधात लढणा-या या शिक्षकावर पोलिसांबाबत तक्रार करतो या कारणावरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी थर्ड डिग्री वापरली़ एकिकडे पोलीस अन् दुसरीकडे गुंड यांच्या कात्रीत या शिक्षकाचे कुटुंबिय सापडले असून पिडीत शिक्षकाने विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवदेन दिले आहे़

संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कुल, पळसे येथील शिक्षक गणेश गोंदके यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर हप्तेखोर पोलीस कर्मचारी व अधिका-यांमुळे ही कठीण वेळ आली आहे़ गोंदके यांचा दोष इतकाच कि त्यांना भ्रष्टाचार बघविला गेला नाही आणि त्यांनी त्याचा जिवंत पुरावा तयार करून वरीष्ठ पोलीस अधिका-यांच्या डोळयात अंजन घालण्यासाठी तसेच दोषींना शिक्षा व्हावी यासाठी तो सोशल मीडीयावर व्हायरल केला़ त्यांनी केवळ पोलिसांचेच नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही पुरावे जमा केले आहेत़ या पुराव्यामुंळेच उत्पादन शुल्कच्या निरीक्षकाने त्यांच्या सासूबार्इंना मारहाण करण्यात केली़ या मारहाणीची तक्रार त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना एकदा नव्हे तर दोनवेळा दिली़

पोलीस उपअधीक्षकाच्या नावाने हप्तावसुली करणा-या विलास पाटील या कर्मचा-याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल केल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाºयाच्या वाहनावरील कर्मचारी वायकांडेचाही व्हिडीओ व्हायरल केला़ यानंतर सासºयांसोबत संबंधित पोलीस कर्मचाºयावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाऊन पुरावेही दिले़ यानंतर सासूच्या मारहाणीबाबत दिलेल्या तक्रारीवरील कारवाईबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या शिक्षक गोंदके याच्यावर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी थर्ड डिग्री वापरून पोलिसाची तक्रार करतो का? तुला दाखवितोच पोलीस काय असतो असे म्हणून तब्बल पाच तास डांबून ठेवत टॉर्चर केले़

सोशल मीडीयावर गोंदके यांनी व्हिडीओ व्हायरल केल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित हप्तेखोर पोलीस कर्मचारी व अधिकाºयांचे धाबे दणाणले़ त्यांनी गुंड तसेच पोलीस बळाचा वापर करून धमकावण्याचा प्रकार सुरू केला आहे़ या प्रकारामुळे गोंदके यांची पत्नी व लहान मुलाला अक्षरश: भूमिगत करावे लागले आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनी तु शिकविण्याचे काम कर, तुला कायदा कळत नाही आम्ही दाखवतो तुला कायदा काय असतो ते असे म्हणून त्र्यंबकेश्वरचे एपीआय बेंडाळे याने वरीष्ठांना फोन लावून मानसिक त्रास दिला़ तसेच नोकरी घालविण्याची धमकीही दिली़एसीबीचे तक्रारदार असुरक्षितलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर तक्रारदारास अक्षरश: वा-यावर सोडले जाते़ या विभागाने नुकताच भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह साजरा केला मात्र तक्रारदाराची जर अशी अवस्था होत असेल तर त्याने आवाज तरी का आणि असा उठवायचा असा सवाल गणेश गोंदके यांनी केला आहे़ दरम्यान, याबाबत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांना निवेदन दिले आहे़

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग