शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

सांगा कसं जगायचं.., कसा हाकायचा कुटुंबाचा गाडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:28 IST

गिरीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क मनमाड : मुलींच्या शाळेची थकलेली फी.. तिला शाळेत पोहोचवणाऱ्या रिक्षावाल्याचा तगादा.. त्यातच पत्नीच्या गरोदरपणामुळे सुरू असलेला दवाखाण्याचा खर्च.. अशा परिस्थितीत लॉकडाउनमुळे महिनाभरापासून बंद असलेला पाणीपुरीचा व्यवसाय.... सांगा कसं जगायच आम्ही? अन् कसा हाकायचा कुटुंबाचा गाडा.., हा प्रश्न उपस्थित केला आहे मनमाड येथील स्टेशनरोडवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाºया सूरजसिंग कुशावह या तरुणाने.

गिरीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : मुलींच्या शाळेची थकलेली फी.. तिला शाळेत पोहोचवणाऱ्या रिक्षावाल्याचा तगादा.. त्यातच पत्नीच्या गरोदरपणामुळे सुरू असलेला दवाखाण्याचा खर्च.. अशा परिस्थितीत लॉकडाउनमुळे महिनाभरापासून बंद असलेला पाणीपुरीचा व्यवसाय.... सांगा कसं जगायच आम्ही? अन् कसा हाकायचा कुटुंबाचा गाडा.., हा प्रश्न उपस्थित केला आहे मनमाड येथील स्टेशनरोडवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाºया सूरजसिंग कुशावह या तरुणाने.पाणीपुरीचे नाव ऐकून जिभेला पाणी सुटते ना..! चविष्ट आणि मनाला भावणाºया या चटकदार पाणीपुरीचे चोचले पुरवणाºया पाणीपुरी व्यावसायिकांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. सूरज हा सतरा वर्षांपासून शहरातील वैंकुठ क्लॉथ सेंटरच्या समोर आपला छोटासा पाणीपुरीचा गाडा लावून व्यवसाय करतो. मूळचा उत्तर प्रदेशातील बेरागडा, जि. जालोन येथील रहिवासी असलेल्या सूरजने आपल्या चटकदार व मसालेदार पाणीपुरीने शहरातील खवय्यांना वेड लावले आहे. पहाटे पाच वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. पुऱ्यांचे पीठ मळण्यापासून ते तळण्याचे काम भल्या पहाटेच सुरू होते. पाण्यासाठी चिंचेचा कोळ बनवणे, मसाला तयार करणे, रगडा तयार करणे या कामामध्ये त्याची पत्नी सोमबत्तीसुध्दा बरोबरीने मदत करते. दुपारी ३ वाजेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर सर्व साहित्य गाड्यावर चढवून स्टेशन रोडवर पाणीपुरी विक्रीचे काम सुरू होते. कष्टाला मेहनतीची जोड मिळाल्याने या व्यवसायात बºयापैकी पैसे मिळतात. घरातील गायत्री व राजनंदिनी या दोन मुलींचे शिक्षण, घरभाडे यासह सर्व खर्च भागवून गावी वृध्द आई-वडिलांना उदरनिर्वाहासाठी पैसे पाठवले जात असल्याचे सूरज सांगतो. अडचणींचा सामना करत सुरू असलेला पाणीपुरीचा हा व्यवसाय गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र विळखा घातलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चांगलाच संकटात सापडला आहे. यावर अवलंबून असलेल्या कुशवाह कुटुंबावर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. सध्या गरोदर पत्नी सोमबत्तीचे बाळंतपणाच्या खर्चाची चिंता, मुलींची शाळेची फी, थकलेले घरभाडे यामुळे गावी वृध्द माता पित्यांना पैसे पाठवू शकत नसल्याची खंत सूरजला सतावते आहे. अशीच परिस्थिती मंगलसिंग- जगदीश कुशावह, हरप्रसाद, रमाकांत यांच्यासह अन्य पाणीपुरी व्यावसायिकांची झाली आहे. कोरोना चा प्रादुर्भाव पाणीपुरी व्यवसायाच्या मुळावर उठला असल्याची भावना या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक