तेलमवाडी शाळेची दुरवस्था

By Admin | Updated: September 6, 2016 22:27 IST2016-09-06T22:27:41+5:302016-09-06T22:27:53+5:30

जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष : पालकांमध्ये संताप, मुलांनी फिरविली शाळेकडे पाठ

Telimewadi school drought | तेलमवाडी शाळेची दुरवस्था

तेलमवाडी शाळेची दुरवस्था

 सुनील शिंदे ल्ल घोटी
मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांना उत्तम व चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे, यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. असेच सारे शिकू या, पुढे जाऊ या हे ब्रीद घेऊन सर्वशिक्षा अभियान ही योजना पुढे आली. या योजनेतून षटकोनी शाळा अनेक ठिकाणी उभारल्या गेल्या. या योजनेचा फायदा इगतपुरी तालुक्यातील कुर्नोली केंद्रांतर्गत असणाऱ्या तेलमवाडी येथील शाळेला देण्यात आला होता; मात्र सुसज्ज इमारती व निष्णात शिक्षक वर्ग लाभूनही या शाळेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसून दिसून आले.
शासन एकही मुलगा अथवा मुलगी शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत आहे. इगतपुरी तालुक्यातही जिल्हा परिषदेच्या अनेक शालेय इमारतींनी कात टाकली असून जुन्या इमारतीची जागा नव्या सुसज्ज इमारतीने घेतली आहे. या नव्या शाळेला ई-लर्निंग साहित्याची जोड मिळवित आपली शाळा डिजिटल व्हावी, यासाठी शिक्षकवर्गासह ग्रामस्थही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन लोकवर्गणी काढून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
एकीकडे विद्यार्थी आहेत, तर शिक्षक नाहीत, शिक्षक आहेत तर इमारत नाही व इमारत आहे तर विद्यार्थी नाही अशी अवस्था असल्याने शिक्षक व इमारत मिळविण्यासाठी पालकांना शाळेला कुलूप लावण्याची केविलवाणी वेळ येत असताना दुसरीकडे मात्र तालुक्यातील कुर्नोली केंद्रांतर्गत येणाऱ्या तेलमवाडी या लहान शाळेत अवघे बावीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी तीन इमारती असून एक स्वतंत्र किचन शेड व शौचालये आहेत. या तिन्ही इमारतींसाठी चाइल्ड फ्रेंडलीमधून खेळाचे साहित्य शासनाने इमारतीच्या बांधकामाबरोबर पुरविले आहे; मात्र या इमारतीची आणि खेळाच्या साहित्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक वाढीसाठी शासनाने दिलेल्या इमारतीची आणि साहित्याची देखभाल करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Web Title: Telimewadi school drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.