शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

तेलगीची सुरुवात नाशिकमधूनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:19 IST

नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात छपाई होणाºया कोट्यवधी रुपये किमतीचे मुद्रांक घेऊन जाणाºया रेल्वे वॅगनमध्ये सातत्याने होणाºया चोºया व सातपूरच्या महादेववाडीत राहणाºया सिंग ऊर्फ बंगाली याच्या घरात सापडलेल्या लाखो रुपयांच्या मुद्रांकामुळेच खºया अर्थाने अब्दुल करीम तेलगी याचे नाव देशपातळीवर चर्चेत आले.

नाशिक : नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात छपाई होणाºया कोट्यवधी रुपये किमतीचे मुद्रांक घेऊन जाणाºया रेल्वे वॅगनमध्ये सातत्याने होणाºया चोºया व सातपूरच्या महादेववाडीत राहणाºया सिंग ऊर्फ बंगाली याच्या घरात सापडलेल्या लाखो रुपयांच्या मुद्रांकामुळेच खºया अर्थाने अब्दुल करीम तेलगी याचे नाव देशपातळीवर चर्चेत आले. नाशिकमधूनच त्याने आपल्या (कु)व्यवसायाला सुरुवात केली, नंतर मात्र त्याची पाळेमुळे देशाच्या कानाकोपºयात खोलवर रुजली. एकटा तेलगीच या प्रकरणात सहभागी झाला नाही तर शासकीय नोकरशहा, पोलीस यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी तसेच राज्यकर्तेही तेलगीच्या गळ्यात गळा घालत असल्याचे पुरावेही याच नाशिक शहरात मिळाले.देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणाºया बनावट मुद्रांक प्रकरणाचा नाशिकशी थेट संबंध असल्यामुळे याच शहरात अब्दुल करीम तेलगी याच्याविरुद्ध केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाला (सीबीआय) गुन्हा दाखल करावा लागला. साधारणत: १९९४ पासून सलग चार वर्षे नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात छपाई होणाºया शंभर, वीस, पन्नास व पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची वाहतूक संपूर्ण देशभरात रेल्वे वॅगनद्वारे केली जाते. तशी ती करताना या रेल्वे वॅगनला रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त पुरविला जातो. अब्दुल करीम तेलगी याने पहिला सुरुंग या रेल्वे पोलिसांच्या बंदोबस्तालाच लावला. लाखो रुपयांची लाच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना देऊन त्यांच्याकरवी मुद्रांक वाहतूक करणाºया वॅगनची इत्यंभूत माहिती तेलगीपर्यंत पोहोचती होऊ लागली व तेथूनच खºया अर्थाने त्याच्या धंद्याला बरकत मिळाली. मुद्रांक वाहून नेणाºया रेल्वेने नाशिकरोड स्थानक ओलांडल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांच्या संगनमताने वॅगनचे सील तोडून त्यातील कोट्यवधींच्या मुद्रांकाची पहिली चोरी साधारणत: १९९४ मध्ये करण्यात आली व त्यानंतर हा प्रकार सातत्याने चार वर्षे घडला. चोरी जाणाºया मुद्रांकाचे पुढे काय होत असे याचा उलगडा कालांतराने झाला, परंतु तोपर्यंत तेलगीने संपूर्ण देशाची बाजारपेठ काबीज करून चोरीचे कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक बाजारात आणून आपले उखळ पांढरे करून घेतले. रेल्वे पोलिसांच्या बंदोबस्तात सातत्याने वॅगनमधून होणाºया चोºयांमुळे बदनाम झालेल्या रेल्वे पोलिसांनी ज्याप्रमाणे याची चौकशी सुरू केली त्याचप्रमाणे स्थानिक पोलिसांनीही या चोºयांचा उलगडा करण्यासाठी कसब पणाला लावले व १९९८च्या दरम्यान सातपूरच्या महादेववाडीत राहणारा सिंग ऊर्फ बंगाली याच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास तत्कालीन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला असता, घरातील बेडरूमच्या गादीखाली ५८ लाख रुपये किमतीचे मुद्रांक सापडले. पोलिसांच्या हातात पहिल्यांदाच तेलगीच्या साखळीतील एक दुवा सापडला व पुढे चौकशी सुरू झाली.देशपातळीवर खळबळ उडवून देणाºया या घटनेची व्याप्ती पाहता नंतर त्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला व बंगालीचे प्रताप हैदराबाद, बेंगळुरू येथेही चांगलेच गाजल्याने कालांतराने तत्कालीन केंद्र सरकारने केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे तपास सुपूर्द केला. नाशिकमध्ये अब्दुल करीम तेलगी याच्यावर २३ कोटी रुपये किमतीचे मुद्रांक चोरीचा व भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुद्रांक घोटाळ्याची सुरुवात नाशिकपासून झाल्याने अब्दुल करीम तेलगीचाही नाशिकशी चांगलाच संबंध आला. १९९४ मध्ये तेलगीसाठी काम करणारा त्याचा हस्तक सिंग ऊर्फ बंगाली याच्या मध्यस्थीने नाशिकरोडच्या एका तारांकित हॉटेलमध्ये तेलगी व नाशिकरोड रेल्वेचे तत्कालीन अधिकारी रामराव पवार यांची बैठक झाली. याबैठकीत तेलगी याने रेल्वेचे अधिकारी व कर्मचाºयांना किमती वस्तू सप्रेम भेट म्हणून देत त्यांच्याशी आपले संबंध आणखी गडद करून घेतले. त्यानंतर मात्र त्याचे वरचेवर येणे-जाणे राहिल्याचे जाणकारांकडून सांगितले गेले. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा तेलगीला आरोपी म्हणून नाशिकच्या न्यायालयात हजर राहावे लागले.पोलीस अधिकाºयांची तेलगीशी हात मिळवणीदेशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणाºया मुद्रांक घोटाळ्यात अब्दुल करीम तेलगी याला भ्रष्ट पोलिसांनी साथ दिली. रेल्वेचे पोलीस अधिकारी रामराव पवार, महमद सरवर याच्यासह सहा ते सात अधिकाºयांवर अब्दुल तेलगीशी संगनमत केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. तत्पूर्वी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक असलेले अनिल देशमुख यांचाही तेलगीशी घनिष्ट संबंध याच काळात उघडकीस आला. सिंग ऊर्फ बंगाली याच्या घरात लाखो रुपयांचे मुद्रांक आढळून आल्यानंतर त्याच्या घराची पुन्हा झडती घेण्याचे ठरविण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी बंगाली याच्या घराच्या झडतीत काहीच मिळाले नसल्याचे सांगितले, मात्र दुसºयाच दिवशी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने बंगालीच्या घरावर छापा मारला असता, पुन्हा कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक सापडले. पोलीस निरीक्षक देशमुख व त्यांच्या काही सहकाºयांनी तेलगीशी सलगी करून लाखो रुपयांची माया घेतल्याचा त्यावेळी आरोप करण्यात आला व देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना सेवेतून निलंबितही करण्यात आले. कालांतराने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.बार बालावर रात्रीत उडविले ९३ लाख रुपयेअब्दुल करीम तेलगी याच्यावर २३ कोटी रुपयांचे मुद्रांक चोरी केल्याच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या होत्या. बनाावट मुद्रांकाच्या छपाईतून मिळालेल्या काळ्यापैशाची विल्हेवाट लावण्यासाठी तेलगी याने मौजमजेवर तुफान पैसा उधळला. नाशिकच्या गुन्ह्यातील दोषारोपपत्रात तेलगी याने ठाण्याच्या बारबालेवर एका रात्रीतून ९३ लाख रुपये उडविल्याची बाब उघडकीस आली होती. यावरून तेलगीच्या काळ्या मायेची कल्पना यावी.आता खटल्याचे काय होणार?नाशिकच्या न्यायालयात तेलगी व त्याच्या साथीदारांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्यातील पहिला आरोपी सिंग ऊर्फ बंगाली हाच कालांतराने सरकारपक्षाच्या बाजूने माफीचा साक्षीदार झाला. काहीकाळ तुरुंगवास भोगल्यानंतर बंगाली याची विनंती न्यायालयाने मान्य करून त्याला जामीन मंजूर केला व तो बाहेर पडला, त्याचवेळी जीवितास धोका असल्याची चर्चा होत होती. परंतु बंगाली याच्या पत्नीने या घटनेनंतर त्याच्याशी संबंध तोडले व पुढे बंगालीही गायब झाला. चौकशीअंती काही वर्षांपूर्वी त्याचेही निधन झाले. त्यामुळे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व माफीचा साक्षीदारही मरण पावल्याने आता या खटल्याचे पुढे काय होणार याविषयी उत्सुकता आहे.नाशिकरोडच्या प्रतिभूती मुद्रणालयातील मुद्रांकाची चोरी करून ख्याती मिळविलेल्या अब्दुल करीम तेलगी याने मुद्रणालयातील अधिकाºयांनाही हाताशी धरल्याची बाब तपासाअंती निष्पन्न झाली होती. प्रतिभूती मुद्रणालयाने काही जुन्या मशिनरी याच काळात विक्रीस काढल्या होत्या. मुळात देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित असलेल्या मशिनरी विक्री करताना त्या सुट्या भागात विक्री केल्या जाव्यात असे अपेक्षित असताना तत्कालीन महाव्यवस्थापक गंगाप्रसाद यांनी संपूर्ण मशिनरी एकाच वेळी विक्रीस काढली व सदरची मशिनरी अब्दुल करीम तेलगी याने विकत घेतल्याचे त्यावेळी उघडकीस आले. गंगाप्रसाद यांच्यावरही तेलगीला मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे प्रतिभूती मुद्रणालय वादाच्या भोवºयात सापडले होते.