तेजुकाया महाविद्यालय सर्वोत्कृष्ट
By Admin | Updated: August 14, 2016 23:06 IST2016-08-14T23:00:48+5:302016-08-14T23:06:38+5:30
विद्यापीठ पुरस्कार प्रदान : नाशिकचा उत्कृष्ट जिल्हा म्हणून गौरव

तेजुकाया महाविद्यालय सर्वोत्कृष्ट
नाशिक : सावित्रिबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते तेजुकाया महाविद्यालयास रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या अभियानात सहभागी ३६ जिल्ह्यांमधून नाशिकला उत्कृष्ट जिल्हा म्हणून गौरविण्यात आले.
देवळाली कॅम्प परिसरातील विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियानात सर्वोत्कृष्ट आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. विक्र म काकुळते, प्रा. सुनीता आडके, संजय कदम यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवत महाविद्यालयात दुचाकीने येताना हेल्मेटशिवाय प्रवेश दिला जात नाही. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करणारे उपक्रम राबविले. त्यामुळे महाविद्यालयास पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. संजयकुमार दळवी, डॉ. संजय खरात व उपस्थित होते. प्रा. विक्रम काकुळते यांनी नाशिकच्या जिल्ह्याचे नेतृत्त्व केले. त्यामुळे प्रा. विक्रम काकुळते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)