‘टेक्नोपेडिया-२०१७’ स्पर्धेत आविष्कार
By Admin | Updated: February 25, 2017 00:45 IST2017-02-25T00:45:46+5:302017-02-25T00:45:58+5:30
विविध प्रकल्पांचे सादरीकरण : महावीर अभियांत्रिकीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा

‘टेक्नोपेडिया-२०१७’ स्पर्धेत आविष्कार
नाशिक : श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर संघवी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक्नोपेडिया- २०१७’ राज्यस्तरीय स्पर्धांचा समारोप उत्साहात झाला. सदर स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प, लॅन गेमिंग , प्रेझेंटिया, सर्किट मेनिया अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यभरातील पदवी, पदविकाच्या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रकल्प स्पर्धेत प्रथम पारितोषिक गुरूगोविंदसिंह पॉलिटेक्निकच्या पायल देवरे, गांगुर्डे सायली, किरण जाधव, रितेश खैरनार यांना प्राप्त झाले. द्वितीय परितोषिक महावीर पॉलिटेक्निकच्या स्वाती बोडके, मुनाली मोरे, अश्विनी पाटील, भूषण भट तसेच के. के. वाघच्या प्रतीक्षा कदम, परिणिता वाघमारे, रश्मी भामरे यांना देण्यात आले. महावीर एज्युकेशनचे हरिष संघवी, संघवी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख सोनाली शिनकर, प्रा. मीनाक्षी आहेर, प्रा. विपूलकुमार पवार, प्रा. सूरज खैरनार, प्रा. विष्णू काळे, प्रा. प्रीती नंदिनीकर, प्रा. वृषाली माने, प्रा. अनिता बैताडे, मोहम्मद उमृद्दिन, प्रा. संदीप पाचपांडे आदि उपस्थित होते.