एटीएमधून रोकड काढण्यात तांत्रिक अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:26 IST2020-12-31T23:18:00+5:302021-01-01T00:26:33+5:30
नाशिक : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या नागरिकांना पूर्वसंधेला चांगलीच आर्थिक चणचण जाणवली. शहरातील कॉलेजरोडसह विविध भागातील एटीएममधून रोख रक्कम काढताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे थेट डेबीट कार्डद्वारे आर्थिक व्यावहार करण्यातही अडचणींचा सामना करावा लागल्याने विविध बँकांच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला नाशिककरांना वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मोबाइल बँकिंगची सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी व्यावहार सुरळीत असले तरी डेबीट कार्डधारकांना पेट्रोल पंप, मिठाईची दुकाने, मेडिकल, मॉल यासह शहरातील विविध दुकानांमध्ये खरेदी करताना ग्राहकांना बँक खात्यात पैसे असतानाही अडचणींचा सामना करावा लागला. दुकानात बिल भरताना अडचणी आल्याने अनेक ग्राहकांनी जवळच्या एटीएम मशीनवर जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु. एटीएममधूनही रोख रक्कम काढण्यात तांत्रिक अडचणी आल्याने ग्राहकांची निराशा झाली. काही ग्राहकांनी थेट दुकानदारांचे बँक खात्यावर इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे जमा करून व्यवहार केल्याचे दिसून आले.