मुदत संपेपर्यंत तांत्रिक अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:27 IST2017-08-06T00:27:25+5:302017-08-06T00:27:31+5:30
प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी वाढवून मिळालेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवशीही करदात्यांची धावाधावच दिसून आली. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना रांगांपासून दिलासा मिळाला खरा.

मुदत संपेपर्यंत तांत्रिक अडचणी
नाशिक : प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी वाढवून मिळालेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवशीही करदात्यांची धावाधावच दिसून आली. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना रांगांपासून दिलासा मिळाला खरा. परंतु, आॅनलाइन रिटर्न्स भरताना वारंवार संकेतस्थळ हँग होणे व धीम्या गतीने काम होणे यामुळे करदात्यांना त्रास सहन करावा लागला. परिणामी ३१ जुलैपर्यंत अनेक करदात्यांना त्यांचे रिटर्न भरता आले नसल्याने ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत शनिवारी (दि.५) रात्री १२ वाजेपर्यंत असल्याने अनेक करदात्यांनी सनदी लेखापालांच्या कार्यालयात बसून प्राप्तीकर विवरणपत्र भरले, तर धीम्या गतीमुळे सुमारे १५ ते २० टक्के करदात्यांना त्यांचे प्राप्तीकर विवरणपत्र भरता आले नसल्याची माहिती सीए संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली.
प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया आॅनलाइन असल्याने जवळपास ८० टक्के करदात्यांनी कर सल्लागार अथवा सनदी लेखापालांच्या मदतीनेच रिटर्न्स भरले. नोटाबंदीनंतर करदात्यांमध्ये रिटर्न भरण्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी आयकर विभागाने दिलेल्या मुदतीत विवरणपत्र दाखल करण्यासाठी करदात्यांचा आग्रह होता. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे मुदतवाढ मिळूनही काही करदात्यांना त्यांचे रिटर्न्स भरता आले नाही. रिटर्न भरण्याची मुदत संपली असली तरी करदाते ३१ मार्चपर्यंत त्यांचे विवरणपत्र सादर करू शकणार आहेत. परंतु, यापुढील काळात करदात्यांना कराच्या रकमेवर दरमहा १ टक्का व्याज दंडात्मक स्वरूपातच मोजावे लागणार असल्याने शासकीय व खासगी क्षेत्रांतील अनेक वेतनधारकांसह छोटे व्यावसायिक आणि एक कोटी रु पयांपर्यंत उलाढाल