अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:07+5:302021-08-29T04:18:07+5:30

नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या प्रथम फेरीसाठी शुक्रवारी (दि.२७) ...

Technical confusion in the eleventh admission process | अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक गोंधळ

अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक गोंधळ

Next

नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या प्रथम फेरीसाठी शुक्रवारी (दि.२७) गुणवत्ता यादी जाहीर होताच, प्रत्यक्ष प्रवेशालाही सुरुवात झाली आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचे दिसून आले. या गोंधळातच सुमारे ४ हजार २२९ विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत सायबर कॅफेसारख्या ठिकाणांवरून अकरावीचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती नसल्याने या वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पडताळणीपूर्वीच अर्जांची प्रिंट काढलेली असल्याने, त्यावर अर्जाची पडताळणीच झालेली नसल्याचे दिसून येत आहे. काही विद्यार्थ्यांनी कागदपत्र अपलोड करताना निश्चित आकारापेक्षा अधिक आकाराची कागदपत्रे अपलोड केल्याने, अशी कागदपत्रे प्रवेशाच्या वेळी संबंधित महाविद्यालयांना दिसत नसल्याचा प्रकार समोर आला आहे, तर काही विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली नसल्याने विद्यार्थ्यांमध्येच संभ्रम उडताना दिसून दिसत आहे. अर्जांची पडताळणी झालेली असतानाही विद्यार्थ्यांकडून आपल्या अर्जाची शाळांनी पडताळणीच केली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शाळांमधील संबंधित यंत्रणा सांभाळणाऱ्या शिक्षकांचीही कोंडी होत असून, त्यांना विद्यार्थ्यांना पुन्हा-पुन्हा प्रवेशप्रक्रिया समजावून सांगावी लागत आहे.

कोट-

ज्या विद्यार्थ्यांचे अपलोड केलेले कागदपत्र महाविद्यालयांना दिसत नाही, त्यांना प्रत्यक्ष कागदपत्र पाहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात येतील. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांनीही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया समजावून घेऊन प्रवेश निश्चित करावा, त्यासाठी संबंधित शाळा, मार्गदर्शन केंद्राची विद्यार्थ्यांनी मदत घ्यावी.

- नितिन उपासणी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

अकरावी प्रवेशाची स्थिती

कनिष्ठ महाविद्यालये - ६०

उपलब्ध जागा - २५,३८०

एकूण अर्ज - २३,१५८

अर्जांची पडताळणी -२०,५३७

पर्याय निवडले -१६,७५२

प्रवेश निश्चित - ४,२२९

रिक्त जागा २१,१५१

Web Title: Technical confusion in the eleventh admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.