मनमाड-करंजवन पाणीपुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST2021-07-25T04:13:43+5:302021-07-25T04:13:43+5:30
मनमाडला भीषण पाणीटंचाई असल्यामुळे मनमाडवासीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. करंजवन योजनेमुळे मनमाड शहराचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने आमदार ...

मनमाड-करंजवन पाणीपुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी
मनमाडला भीषण पाणीटंचाई असल्यामुळे मनमाडवासीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. करंजवन योजनेमुळे मनमाड शहराचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने आमदार सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शासन निर्णयातून या योजनेला खास बाब म्हणून सूट मिळवून घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन करंजवन योजना समितीवर लोकप्रतिनिधी म्हणून नेमणूक व्हावी यासाठी विनंती केल्यामुळे समितीवर आमदारांची नेमणूक करण्यात आली. यामुळे करंजवन योजनेच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र शासन वित्त विभागाने अंदाजपत्रके व आराखड्यांची तपासणी करून तपासणीअंती २४० कोटी इतक्या खर्चास तांत्रिक मंजुरी दिली आहे. मनमाड शहराचा वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्यामुळे जनतेने समाधान व्यक्त केले आहे.