शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी जुन्या नाशकाच्या वाटा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 17:02 IST

काही दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाने येथील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित केला होता; मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देकोरोनाचा वाढता फैलाव आणि नागरिकांची उदासिनतारस्तेबंदीची वेळ येणे ही मोठी धोक्याची घंटा

नाशिक : महिनाभरापासून जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीत कोरोनाचे संक्रमण वेगाने होत असून मोठ्या संख्येने बाधित रूग्ण आढळून आले तसेच याच भागातील बहुतांश कोरोना रूग्ण मृत्यूमुखी पडले; कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या आयुक्तांनी दौरा करून या परिसराचा ‘संपर्क’ तोडण्यासाठी जुन्या नाशकात येणाऱ्या वाटा बंद करण्याचा निर्णय घेतला.जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, बागवानपुरा, काजीपुरा, चौक मंडई, नानावली, कथडा, मोठा राजवाडा या सर्वच भागात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढली. जुन्या नाशकात वेगाने फैलावणा-या कोरोनाला नियंत्रणात आणायचे तरी कसे? असा यक्ष प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला. कारण प्रचंड दाट लोकवस्ती, अरूंद गल्लीबोळ आणि घरे, शिक्षणाचा आणि सामाजिक नितीमुल्यांचा अभाव यामुळे या भागात कोरोना नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. अद्यापही कोरोनाचे रूग्ण या भागात आढळून येतच आहे. जुन्या नाशकातील कोरोना रूग्णांची शंभरी पार झाली असेल.काही दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाने येथील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित केला होता; मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. परिणामी शुक्रवारी (दि.१०) मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या भागाचा पुन्हा पाहणी दौरा करून जुन्या नाशकात जाणारे रस्ते तत्काळ बॅरिकेडिंग लावून बंद करण्याचे आदेश दिले. यानुसार आता केवळ मेनरोड, दहिपूल, सरस्वती नाला, तिवंधालेन, भद्रकाली या भागातूनच जुन्या नाशकात ये-जा करण्याचे मार्ग मोकळे ठेवले गेले आहेत. उर्वरित सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहे.येथून प्रवेश बंदसारडासर्कलवरून दूधबाजार, चौकमंडईत जाणारे दोन्ही रस्ते. द्वारकावरून नानावली, बागवानपु-यात जाणारा रस्ता, तसेच फाळकेरोड, शिवाजीचौकातून तिगरानियाकडे जाणारा रस्ता, खडकाळी सिग्नल, वडाळानाका येथून जुन्या नाशकात येणारे रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले. एकीकडे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असतानाही या भागात मात्र रस्तेबंदी करण्याची वेळ येणे ही मोठी धोक्याची घंटा आहे. यावरून जुन्या नाशकात कोरोनाचा वाढता फैलाव आणि नागरिकांची उदासिनता सहज लक्षात येते. 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस