निवडणुकीसाठी पथके कार्यान्वित

By Admin | Updated: September 5, 2014 00:34 IST2014-09-04T23:28:06+5:302014-09-05T00:34:15+5:30

निवडणुकीसाठी पथके कार्यान्वित

The teams for elections are implemented | निवडणुकीसाठी पथके कार्यान्वित

निवडणुकीसाठी पथके कार्यान्वित


नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा निवडणूक कार्यालयाने आयोगाच्या सूचनेनुसार व्हिडीओ, व्हिडीओ सर्व्हिलन्स व आचारसंहिता अशी तीन पथके गठित केली असून, गुरुवारी या तीनही पथकातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अशा प्रकारची पथके गठित करण्याच्या सूचना केल्या होत्या. ऐनवेळी आयोगाचे आदेश आल्याने प्रशासनाची धावपळ उडून पथकांसाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागला होता. त्यातच पथकांच्या कामाची अंमलबजावणी आचारसंहिता जारी झाल्यानंतर तत्काळ करण्याचे आदेश आयोगाचे असल्याने अशा पथकांची कार्यप्रणाली, त्यांची जबाबदारी, कर्तव्य आदि बाबींबाबत मार्गदर्शनाचा अभाव दिसून आला, परिणामी पथके भरकटल्याचे निदर्शनास आले होते. त्यातही या पथकांवर थेट नियंत्रण कोणाचे व त्यांनी त्यांच्या कर्तव्यपूर्तीचा अहवाल कोणाला सादर करावा याबाबतही संदिग्धता लक्षात आल्यामुळे गोंधळ उडाला होता. या साऱ्या बाबी टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने निवडणुकीपूर्वीच तयारी केली आहे. या पथकांसाठी शासकीय कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याने, प्रत्येक पथकाला त्याची जबाबदारी व कर्तव्याची माहिती करून देण्यासाठी नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यात विशेष करून पथकातील सदस्यांची एकमेकांशी रुजुवात करून देतानाच त्यांना त्यांच्या कार्यकक्षा व जबाबदारीचे मार्गदर्शन, तसेच शंका-समाधान करण्यात आले. आचारसंहिता जारी होताच या पथकांनी आपापल्या मतदारसंघात दाखल होऊन कार्यान्वित होण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: The teams for elections are implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.