लोकमत न्यूज नेटवर्कवाडिवºहे : इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व इगतपुरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आदिवासी विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी अध्यापन कौशल्य कार्यशाळा पार पडली.यावेळी कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाजाचे इगतपुरी संचालक भाऊसाहेब खातळे उपस्थित होते. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी जास्त सजग राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. इंग्रजी भाषेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी खास वेळ काढून प्रयत्न करणे आवश्यक आहे.प्राचार्य डॉ. ए. पी. पाटील यांनी उद्घाटनपर मनोगतात आपले विविध अनुभव कथन केले. या कार्यशाळेत प्रा.डॉ. शरद बिन्नोर, प्रा. श्रीमती प्रतिभा घुगे, श्रीमती वैशाली रणदिवे यांनी तसेच पंचवटी विद्यालयाचे प्राचार्य आशिषकुमार खुळे, भरत शिरसाठ यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर.एस. हिरे आणि आभार प्रदर्शन उपप्राचार्य देवीदास गिरी यांनी केले. यावेळी इगतपुरी तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील इंग्रजीचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईगतपुरी केपीजी महाविद्यालयात शिक्षकासाठी अध्यापन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 17:40 IST
वाडिवºहे : इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व इगतपुरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आदिवासी विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी अध्यापन कौशल्य कार्यशाळा पार पडली.
ईगतपुरी केपीजी महाविद्यालयात शिक्षकासाठी अध्यापन कार्यशाळा
ठळक मुद्देमाहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी जास्त सजग राहणे आवश्यक