शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

शिक्षकांना घरबसल्या एका क्लिकवर मिळणार पगारपत्रके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:16 IST

सिन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली मासिक पगार बिले सादर करण्यासाठी सिन्नरच्या पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना समन्वय समिती, सिन्नर यांच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली असून, आता शिक्षकांना केवळ एका क्लिकवर आपली पगारपत्रके उपलब्ध करून दिली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांनी दिली.

सिन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली मासिक पगार बिले सादर करण्यासाठी सिन्नरच्या पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना समन्वय समिती, सिन्नर यांच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली असून, आता शिक्षकांना केवळ एका क्लिकवर आपली पगारपत्रके उपलब्ध करून दिली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांनी दिली.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली पगारपत्रके ई-सॅलरी बुक या अ‍ॅपच्या माध्यमातून आॅनलाइन घरबसल्या एका क्लिकवर बघता येणार आहे. याआधीच प्राथमिक शिक्षकांची पगारबिले ही शालार्थ प्रणालीद्वारे काढली जात होती. त्याचाच पुढील भाग म्हणून पं.स सिन्नर शिक्षण विभागातर्फे सर्वच शिक्षकांना या ई-सॅलरी बुक या अ‍ॅपच्या माध्यमातून सहजपणे पगारपत्रके पाहता येणार असल्याने शिक्षक तसेच प्रशासनाच्या दृष्टीने खूपच उपयुक्त ठरणार आहे.या प्रणालीमध्ये पगारपत्रक सहजपणे एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने वेतनातील त्रुटी लक्षात येतात. त्यासाठी शिक्षकांना स्वत:चा मोबाइल क्रमांक, यूजर नेम आणि पासवर्ड वापरून फक्त आपला स्वत:चाच पगार पाहता येत असल्याने गुप्तता पाळली जाते. पगारपत्रकामध्ये मुख्याध्यापक यांच्याशिवाय इतर कोणालाही बदल करता येणार नाही. पगारपत्रकासोबत वर्षाअखेर भरावयाचे इन्कम टॅक्स स्टेटमेंट आपोआप उपलब्ध करून दिले जाते. या प्रणालीमुळे शिक्षकांचे वेतनासंबंधीच्या अडचणी दूर होणार असून सहज, सुलभ प्रणालीचा शिक्षकांना फायदा होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांनी सांगितले.--------------------अ‍ॅपमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा..प्रत्येक महिन्याचे पगारपत्रक सहजपणे एका क्लिकवर उपलब्ध, शासन निर्णय, जीआर, विविध प्रस्ताव नमुने, माहितीपत्रके तत्काळ वेळेवर उपलब्ध, पगारपत्रक पीडीएफ स्वरूपात असल्याने तात्काळ प्रिंट काढता येतात, आर्थिक वर्षाच्या शेवटी आवश्यक असणारे इन्कम टॅक्स विवरण/स्टेटमेंट आपोआप तयार होते. परिणामी त्यात होणाºया चुका टाळल्या जातील. आपल्या पगारात काही बदल करावयाचे असल्यास किंवा काही शंका असेल तर अ‍ॅपवर तक्रार करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध असणार आहे. या प्रणालीमुळे शिक्षकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक