शिक्षक दिनी कळवणला शिक्षकांचा झाला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:50 PM2020-09-06T17:50:20+5:302020-09-06T17:51:14+5:30

कळवण : शिक्षक हा सामाजिक उन्नती साठी प्रयत्न करणारा महत्वाचा घटक असून खडतर परिस्थितीतही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत जबाबदार व आदर्श नागरिक निर्माण करण्यात शिक्षकांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे यांनी व्यक्त केले.

Teachers were honored to report on Teacher's Day | शिक्षक दिनी कळवणला शिक्षकांचा झाला सन्मान

- कळवण येथे शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान कार्यक्रम प्रसंगी रविंद्र देवरे, त्र्यंबक रौंदळ, चंद्रकांत कोठावदे, प्रमोद रौंदळ, सौ संगीता देवरे, सुचिता रौंदळ व शिक्षिका.

Next
ठळक मुद्दे दहावी आण िबारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार

कळवण :शिक्षक दिनानिमित्त कळवण येथे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे यांच्यावतीने जानकाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कळवण, टी. एन. रौंदळ सायन्स कॉलेज व किड्स लिर्नग स्कूल भेंडी येथील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व दहावी आण िबारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून चिंतामणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबक रौंदळ, जानकाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठावदे,मजूर फेडरेशन च्या माजी उपाध्यक्ष संगीता देवरे,प्रमोद रौंदळ, रवींद्र पगार, दीपक महाजन, रवींद्र बोरसे,पत्रकार राकेश हिरे,किड्सच्या मुख्याध्यापक सुचिता रौंदळ, जानकाईचे मुख्याध्यापक मनोज जोशी उपस्थित होते.
जयदीप शिवले, सुचिता रौंदळ, मनोज जोशी, राकेश हिरे, रविंद्र बोरसे, दीपक महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन बापू पवार यांनी केले. राजेंद्र अमृतकर यांनी आभार मानले. कार्यक्र मास साहेबराव पगार,दीपक शिवले आदींसह किड्स लिर्नग स्कूल, टी. एन. रौंदळ सायन्स कॉलेज भेंडी, जानकाई विद्यालय कळवण चे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: Teachers were honored to report on Teacher's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.