शिक्षकांसाठी विद्यार्थिनींनी केला अन्नत्याग
By Admin | Updated: February 3, 2016 23:14 IST2016-02-03T23:14:20+5:302016-02-03T23:14:52+5:30
तिल्लोळी आश्रमशाळा शिक्षक, कर्मचारी आंदोलन सुरूच

शिक्षकांसाठी विद्यार्थिनींनी केला अन्नत्याग
दिंडोरी : शिक्षकांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी येथील इयता पहिली ते दहावीच्या विद्यार्थिनीनी जेवण करण्यास नकार दिल्याने शिक्षक जो पर्यंत शाळेत येत नाही तोपर्यंत जेवण करणार नसल्याचे विद्यार्थिनीनी सांगितल्याने संस्थेच्या प्रशासनाची धावपळ सुरु झाली. त्यांनी त्वरीत विद्यार्थिनीच्या पालकांना फोन करून घरी पाठवून देण्यास सुरवात केली. दहावीच्या विद्यार्थिनी होस्टेलला असून त्यानीही जेवणास नकार दिल्याचे समजते. शिक्षकांच्या विविध प्रश्नावर आदिवासी विकास भवन समोर उपोषण सुरू आहे.
दिंडोरी तालुक्यातील पुणे येथील संस्थेची अनुदानित ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळा असून येथील संस्थेच्या प्रशासनाकडून ज्यांचा शालेय घटकांशी संबंध नसतानाही पूर्णवेळ संस्थेच्या व्यवस्थापनाकडून, विदयार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची मानिसक पिळवणूक व काम करून घेतले जात आहे. महिला कर्मचारी यांना शालेय वेळाव्यतिरिक्त रात्रीच्या वेळपर्यंत व सकाळी पण जास्त काम करून घेतले जात असून आर्थिक पगार कपात केली जात आहे. विद्यार्थीनीना पोटभर जेवण दिले जात नसल्याने पालकही तक्र ार करत आहे. यामुळे १ फेब्रुवारी पासून स्वाभिमानी संघटनेचे राज्य अध्यक्ष भरत पटेल, रामकृष्ण सावंत ,श्रीमती लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली २३ शिक्षक कर्मचारी यांनी आदिवासी विकास भवन समोर उपोषण सुरु केले आहे.