शिक्षकांनी कोरोना चाचणी करून विद्यार्थ्यांच्या समोर जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:10+5:302021-07-27T04:15:10+5:30
सिन्नर : आठवी ते बारावीचे ग्रामीण भागात जेथे कोरोना रुग्ण नाहीत, अशा गावांत शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र या ...

शिक्षकांनी कोरोना चाचणी करून विद्यार्थ्यांच्या समोर जावे
सिन्नर : आठवी ते बारावीचे ग्रामीण भागात जेथे कोरोना रुग्ण नाहीत, अशा गावांत शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र या वर्गात शिकविणा-या शिक्षकांनी कोरोना आरटीपीसीआर चाचणी करून विद्यार्थ्यांसमोर जाणे बंधनकारक असल्याच्या सूचना माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी केल्या.
गुरुपौर्णिमेनिमित्त भिकुसा हायस्कूल येथे सिन्नर तालुक्यातील मुख्याध्यापक सभेत मार्गदर्शन करताना झनकर बोलत होत्या. व्यासपीठावर शिक्षण विस्तारअधिकारी मंजूषा साळुंके, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी. देशमुख, कार्याध्यक्ष आर.बी. एरंडे, मार्गदर्शक रामनाथ लोंढे, बी.व्ही. पांडे आदी उपस्थित होते.
दीड वर्षापासून जे विद्यार्थी शिक्षण प्रवाहात किंवा शाळेत नाही, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे. महामारीप्रसंगी शाळा, मुख्याध्यापक किंवा कर्मचारी यांच्या समस्या वैयक्तिक जाणून घेत त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याविषयी झनकर यांनी सर्वांना आश्वासन दिले. याप्रसंगी विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षीची शिष्यवृत्ती लवकरच शाळेच्या खात्यावर अदा करण्यात येईल, असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंके यांनी दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा सुरू करताना पालकांचे संमतीपत्र सक्तीचे करावे. ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसभेचा ठराव घेऊनच शाळा सुरू कराव्यात. विद्यार्थ्यांना सॅनिटाइझ करावे व तापाची तपासणी करूनच वर्गात बसू द्यावे. फक्त ५० टक्के उपस्थिती ठेवूनच ११ ते ५ या वेळेत शाळा भरवाव्यात, अशा सविस्तर सूचना दिल्या. प्रास्ताविक बाळासाहेब पांडे यांनी केले. यावेळी एम. के. वाघ, भागवत आरोटे, एस.एस. जगदाळे, डी.बी. रानडे, एस. के. मुखेकर, अशोक बागुल, बी. आर. खैरनार, एस. एम. शेलार, डी. बी. पवार आदींसह मुख्याध्यापक उपस्थित होते.
--------------------------
आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आदेश
शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे नियोजन त्यात्या तालुक्यातील गटशिक्षणाधिका-यांनी करून घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांनी दिल्या. तसेच सिन्नर तालुक्यात दररोज ७० शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे नियोजन करावे, असा आदेश झनकर यांनी दिल्याचे तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख यांनी सांगितले.
फोटो ओळी : सिन्नर तालुका मुख्याध्यापकांना मार्गदर्शनप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर. समवेत एस. बी. देशमुख, आर. बी. एरंडे, रामनाथ लोंढे, बी. व्ही. पांडे आदी. (२६ सिन्नर १)
260721\26nsk_31_26072021_13.jpg
२६ सिन्नर १