येवला तालुका मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षक संघ यांची संयुक्त सहविचार सभा शहरातील एन्झोकेम हायस्कूल येथे पार पडली. यावेळी देशमुख बोलत होते. तालुक्यातून सेवाज्येष्ठता यादी बाबत अनेक प्रकारच्या तक्रारी मुख्याध्यापक संघाकडे आल्या आहेत. याबाबत नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याशी चर्चा करून संस्थेला सेवाज्येष्ठता यादी मुख्याध्यापकांच्या साहाय्याने संस्थेने अद्यावत करून घ्यावी व कोणाचीही पदोन्नती डावलली जाणार नाही, याची काळजी घेणे बंधनकारक असेल, अशा स्वरूपाचे पत्र शिक्षण उपसंचालकांनी प्रत्येक संस्थेला द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षकांचे पगार वेळेवरच १ ते ५ तारखेच्या दरम्यान व्हावेत, पीएफ स्लिपा राहिलेल्या सर्व शाळांना मिळाव्यात, वरिष्ठ व निवड श्रेणी विना अट द्यावी, डी.एड टू बी.एड. प्रमोशन त्वरित दिले जावे, वैद्यकीय बिले, फरक बिले, थकीत वेतन त्वरित मिळावे, आदी विषयांवरही वादळी चर्चा झाली. सदर प्रश्न आठ दिवसांच्या आत न सुटल्यास शिक्षक आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देशमुख यांनी दिला.
सभेस एन्झोकेम हायस्कूलचे मुख्याध्यापक के. जी. जगताप, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंडित मढवई, एनडीएसटी संचालक अण्णासाहेब काटे, डी. आर. नारायणे, गोरख येवले, जावेद अन्सारी, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश जोरी, गोरख कुलधर, अर्जुन घोडेराव, राजेंद्र पाखले, सुनील मेहत्रे, सुषमा नागडेकर, बी. व्ही. पांडे, परशराम मोरे, आप्पासाहेब जमधडे, अरुण विभूते आदी उपस्थित होते.