शिक्षकांचा पोलीस प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप : आक्रमक पवित्रा :
By Admin | Updated: April 29, 2017 21:24 IST2017-04-29T21:24:28+5:302017-04-29T21:24:28+5:30
४ मेपासून करणार आमरण उपोषण

शिक्षकांचा पोलीस प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप : आक्रमक पवित्रा :
नाशिक : जिल्हा बँकेकडून शिक्षकांचे वेतन होत नसून शिक्षकांनी विविध ठिकाणी आर्थिक व्यवहारांसाठी दिलेल्या धनादेशाचा अनादर होऊनही पोलीस याप्र्रकरणी तक्रारही नोंदवून घेत नाहीत. मात्र वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर मात्र पोलिसांनी तत्काळ गुन्हे नोंदविले असून, पोलिसांकडून शिक्षकांसोबत पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीने केला आहे. या प्रकरणी शिक्षकांच्या वेतनासाठी शिक्षक संघटनांनी सारडा कन्या महाविद्यालयात बैठक घेऊन ४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षकांना वेतन मिळत नसल्याने शुक्रवारी (दि.२७) विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन करीत शिक्षकांनी गडकरी चौकात रास्ता रोको केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आंदोलक शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.