पिंपळगाव महाविद्यालयात वृक्ष भेट देऊन शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:20 IST2020-09-07T21:48:41+5:302020-09-08T01:20:41+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिक्षकांना फळ झाड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Teachers honored by visiting tree at Pimpalgaon College | पिंपळगाव महाविद्यालयात वृक्ष भेट देऊन शिक्षकांचा गौरव

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनानिमित्त प्रतिमापूजनप्रसंगी उपप्राचार्य संदीप समदडिया. विभागप्रमुख चंद्रकांत निकुंभ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.

ठळक मुद्देसर्वपल्ली राधाकृष्णन यांना नेमिनाथ जैन विद्यालयात अभिवादन

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिक्षकांना फळ झाड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एन अहिरे. ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज प्रा. दिलीप माळोदे, प्रा. ज्ञानोबा ढगे, दिनेश दरेकर, कैलास घुमरे, राजेंद्र जाधव, उज्ज्वला डेरे, जयश्री गोवर्धने, एस.बी. तांबे, ए.बी गुंजाळ, गोकुळ बोरसे, शरद भदाणे, ऋ षिकेश मार्कंड आदी उपस्थित होते.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांना नेमिनाथ जैन विद्यालयात अभिवादन
चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षकदिन साजरा झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.संगीता बाफना यांनी दिली. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला उपप्राचार्य संदीप समदडिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख चंद्रकांत निकुंभ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Teachers honored by visiting tree at Pimpalgaon College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.