शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, मुख्याध्यापकांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:57 IST

नाशिक : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आयोजित शिक्षक दरबारात शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेबर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात हजर राहून त्यांच्या विविध समस्या व प्रश्नांचा लेखी व तोडी स्वरूपात पाढा वाचला.

ठळक मुद्देशिक्षक दरबार : रखडलेले वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव मार्गी लावण्याची मागणी

नाशिक : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आयोजित शिक्षक दरबारात शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेबर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात हजर राहून त्यांच्या विविध समस्या व प्रश्नांचा लेखी व तोडी स्वरूपात पाढा वाचला.नाशिकरोड येथील के जे मेहता हायस्कूलच्या शोभेंदू सभागृहात मंगळवारी (दि.९) नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर- वीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हस्कर, उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे आदींच्या उपस्थितीत शिक्षण दरबार घेण्यात आला.यावेळी शिक्षकांनी रखडलेले वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, प्रलंबित डी.एड. ते बी.एड वेतन श्रेणी, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदानित बदलीस मान्यतेच्या प्रश्नांसह शैक्षणिक पात्रतेनुसार संवर्ग बदलाचे प्रस्ताव मार्गी लावणे, सर्व शाळांची सेवा सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करण्याचे आदेश देणे, दप्तर दिरंगाई दूर करण्यासोबतच विशेष शिक्षक अपंग, गतिमंद विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकांचे समायोजन त्वरित करण्याची मागणीही शिक्षकांनी यावेळी केली.मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षक दरबारामध्ये त्यांच्या व्यथा मांडचानाच त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचे समाधान सूचना यावेळी करण्यात आल्या. संभाजी पवार ,संजय चव्हाण, मोहन चकोर ,एस के सावंत, एस बी देशमुख, मधुकर वाघ, प्रदीप सांगळे, बाळासाहेब ढोबळे, राजेंद्र सावंत, रोहित गांगुर्डे ,दिनेश अहिरे ,सीपी कुशारे, संजय गीते ,योगेश पाटील, अशोक कदम ,दिगंबर नारायणे ,भाऊसाहेब शिरसाठ, दीपक याळीस ,कलीम अन्सारी इत्यादींनी चर्चेत भाग घेऊन शिक्षकांचे प्रश्न मांडले.शिक्षणांच्या मागण्या-अनुकंपा तत्त्वावरील मान्यता द्यावी- पात्र शिक्षकांना शालार्थ आय.डी. द्यावेत- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या योजना (पेन्शन) त्वरित मार्गी लावाव्यात-मेडिकल बिल रजा रोखीकरण,फरक बिल तत्काळ मिळावेतपी.एफ स्लिपा व पे युनिटच्या समस्या मार्गी लावाव्यात-संच मान्यता दुरुस्ती करावीवेतनेत्तर अनुदान देणेशिक्षकांनी मांडल्या समस्यामाध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये सेवाज्येष्ठता बाबत गेल्या ऑगस्ट महिन्यापासून अन्याय दूर करण्यासाठी दाद मागण्यात आली. परंतु वेळोवेळी सुनावणी घेऊनही आज पर्यंत माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाने सुनावणीचे निर्णय कळवला नसल्याची तक्रार चांदवड तालुक्यातील पाथरी येथील माध्यमिक शिक्ष तानाजी कदम यांनी माडलीइंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करताना योग्य शैक्षणिक पात्रता शिक्षण विभागाकडून मान्यता तसेच घेतली जाणारी फी याबाबत शिक्षण विभागाचे लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी केली.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डी.एड वेतन श्रेणी ते बी.एड वेतनश्रेणीच्या मान्यता तसेच विनाअनुदानित शाळेवरून अनुदानित शाळेत बदलीच्या मान्यता तात्काळ देण्याची मागणी नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर यांनी केली.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक