शिक्षिकेचा धारधार शस्त्राने खून

By Admin | Updated: July 5, 2014 00:20 IST2014-07-04T22:35:03+5:302014-07-05T00:20:04+5:30

शिक्षिकेचा धारधार शस्त्राने खून

The teacher's head murdered by the weapon | शिक्षिकेचा धारधार शस्त्राने खून

शिक्षिकेचा धारधार शस्त्राने खून

लासलगाव : येथून जवळच असलेल्या निमगाव वाकडा येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका अर्चना शांताराम लकारे (वय २३, मूळ रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांची धारधार शस्त्राने हत्त्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेतील मारेकरी मुकेश साबळे याने वार करत स्वत:लाही जखमी केल्याने एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वळदगाव शाळेत कोपरगाव येथील अर्चना शांताराम लकारे या प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरीस होत्या. त्या निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील भाईदास पंडित शिसव यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्यास होत्या. शुक्रवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घरमालक सुनंदा भाईदास शिसव यांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी ही माहिती गणेश वडनेरे यांना दिली. ते घटनास्थळी दाखल झाले असता अर्चना लकारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. मारेकऱ्याने दरवाजा आतून बंद केला असल्याने गणेश वडनेरे यांनी दाराला बाहेरून कडी लावत घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, दीपक आवारे, कॉ. सूरज मेढे, बी.आर. बिन्नर हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता घरात अर्चना लकारे या मृत, तर मुकेश गोपाळ साबळे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. या ठिकाणीच धारदार सुरा व कोयता पडलेला होता. मुकेश साबळे (वय २५, रा. कसबा पेठ, पुणे) याला तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालायात हलवण्यात आले. पोलिसांना घरात सापडलेल्या बॅगमध्ये मुकेश साबळे याचे शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, परीक्षेचे हॉल तिकीट तसेच पॅनकार्ड आढळले. तसेच एका कोऱ्या कागदावर पेनने गणपतीचा फोटो काढून त्यामध्ये अर्चना-मुकेश असे नाव लिहून त्याखाली ‘अर्चना मुकेश बाप्पा आमची जोडी अशीच राहू दे’ अशा मजकुराचा कागद आढळून आला. त्यामुळे प्रेम प्रकरणातून ही हत्त्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत गणेश विजय वडनेरे याच्या फिर्यादीवरून मुकेश साबळे याच्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३०२, ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The teacher's head murdered by the weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.