ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:33+5:302021-09-07T04:18:33+5:30

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संचालक चतुरभाऊ नेरे, शालेय समिती उपाध्यक्ष चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक भदाणे, ग्रामोदय ...

Teachers felicitated at Gramodaya Madhyamik Vidyalaya | ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात शिक्षकांचा सत्कार

ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात शिक्षकांचा सत्कार

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संचालक चतुरभाऊ नेरे, शालेय समिती उपाध्यक्ष चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक भदाणे, ग्रामोदय प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सतीश अकलाडे, प्रसाद जावळे आदी उपस्थित होते. स्वागत व सत्कार विद्यालयाचे प्राचार्य माणिक भदाणे यांनी पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला व शारदामातेच्या प्रतिमेला मान्यवरांचे हसते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते नेट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटतर्फे कॉम्प्युटरच्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक कुंवर अनिल व आभार पवार संजय यांनी मानले.

Web Title: Teachers felicitated at Gramodaya Madhyamik Vidyalaya