‘त्या’ शिक्षकाचा मागवला अहवाल
By Admin | Updated: February 3, 2016 23:23 IST2016-02-03T23:21:14+5:302016-02-03T23:23:52+5:30
शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी

‘त्या’ शिक्षकाचा मागवला अहवाल
कळवण : तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक असनाऱ्या पिंपळे (सावरपाडा) येथील शाळेतील एका प्राथमिक शिक्षकाच्या मनमानी कारभाराबाबातचा अहवाल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणधिकाऱ्यांनी गटशिक्षणधिकाऱ्यांकडून मागविला असल्याचे वृत्त आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे बु, सावरपाडा यथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची सोमवारी भेट घेवून प्राथमिक शिक्षक अहिरे यांच्याबाबत तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे बु (सावरपाडा) येथील कार्यरत प्राथमिक शिक्षक दिनकर दौलत अहिरे यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थासह पंचायत समिती शिक्षण विभाग, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणधिकारी प्राथमिक विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार व निवेदन देवुन संबधित शिक्षकावर कारवाई करण्याबाबत मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी डी एल कोळी यांची चौकशी करणेकामी नेमणूक करून सदर प्राथमिक शिक्षक अहिरे यांचा सखोल चौकशी अहवाल कोळी यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे.
शिक्षणधिकाऱ्यांनी कळवण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्राथमिक शिक्षक अहिरे यांच्या विरु ध्द खाते चौकशी प्रस्तावित करणेकामी दोषारोप पत्र एक ते चार व त्या अनुषंगाने आवश्यक ते कागदपत्र कार्यालयात सादर करण्याच्या सूचना केल्या असून तत्काळ प्रस्ताव सादर न केल्यास गटशिक्षणधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे सुचित केले आहे ,त्या अनुषंगाने गटशिक्षणधिकारी पवार यांनी प्राथमिक शिक्षक अहिरे यांचा प्रस्ताव तयार केला असून शिक्षणधिकाऱ्यांकडे आज गुरु वारी सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कळवण तालुक्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा बोजवारा उडाला असून शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर असताना पंचायत समितीच्या सभापती ,उपसभापतीसह आजी माजी पदाधिकारी ,पंचायत समिती सदस्य यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षां सौ जयश्री पवार यांच्यासमोर नाराजी बोलून दाखवल्याने कळवण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सद्यस्थितीत सुरु असलेल्या कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्र ार नोंदविण्यात आली आहे, कळवण पंचायत समितीला कायमस्वरूपी गटशिक्षणधिकारी द्यावा अन्यथा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला कुलूप लावण्याचा इशारा माजी सभापती मधुकर जाधव यांनी आज दिला. (वार्ताहर)