डोंगरगाव विदयालयात वृक्षारोपणासाठी शिक्षक अन् कर्मचाऱ्यांनी खोदले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 01:44 PM2020-06-28T13:44:23+5:302020-06-28T13:45:43+5:30

मेशी : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे अद्यापही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु झालेल्या नाहीत. शासनाचे अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत सपष्ट असे आदेश नाहीत, त्यामुळे कर्मचारी वर्ग व पालक संभ्रमात आहेत.

Teachers and staff dug pits for tree planting in Dongargaon Vidyalaya | डोंगरगाव विदयालयात वृक्षारोपणासाठी शिक्षक अन् कर्मचाऱ्यांनी खोदले खड्डे

डोंगरगाव विदयालयात वृक्षारोपणासाठी शिक्षक अन् कर्मचाऱ्यांनी खोदले खड्डे

googlenewsNext
ठळक मुद्देशाळेत दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्र म असतोच,

लोकमत न्यूज नेटवर्क
मेशी : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे अद्यापही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु झालेल्या नाहीत. शासनाचे अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत सपष्ट असे आदेश नाहीत, त्यामुळे कर्मचारी वर्ग व पालक संभ्रमात आहेत.
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचा प्रत्येक शाळेत दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्र म असतोच, परंतु सध्या विद्यार्थी नसुन सुध्दा देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील कृष्णाजी माऊली विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे खोदले आहेत.
सोशल डीस्टन्सिगचे नियम पाळून आणि मास्क व सॅनिटायझरचा उपयोग करून खड्डे खोदकाम केले आहे. लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्र म संपन्न होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात चांगला पाऊस होत असल्याने वृक्ष लागवड लांबणीवर पडू नये म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. सावंत व कर्मचारी यांनी स्वत: खड्डे तयार करु न वृक्षारोपण करण्याचा आणि संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली आहे.
 
Web Title: Teachers and staff dug pits for tree planting in Dongargaon Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.