शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला कॉपी पुरविणाऱ्या शिक्षक पतीला रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:19 IST

नाशिक येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी  पुरविणाऱ्या शिक्षक पतीला  रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आह. डायटचे परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच त्यांनी महाविद्यालयांच्या आवारात पळ काढलाा. मात्र परीक्षा नियंत्रकांनी संबधित विद्यार्थीनीचा पेपर काढून घेतल्याची माहिती परीक्षा केंद्रप्रमुक आर.डी बच्छाव यांनी दिली आहे.  

ठळक मुद्देडीएड परीक्षेत कॉपीचा प्रकार उघडकीस शिक्षक पतीकडून कॉपी पुरविण्याचा प्रयत्न परीक्षार्थी महिलेचा पेपर परीक्षा नियंत्रकांकडून जप्त

नाशिक : येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी  पुरविणाऱ्या शिक्षक पतीला  रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आह. डायटचे परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच त्यांनी महाविद्यालयांच्या आवारात पळ काढलाा. मात्र परीक्षा नियंत्रकांनी संबधित विद्यार्थीनीचा पेपर काढून घेतल्याची माहिती परीक्षा केंद्रप्रमुक आर.डी बच्छाव यांनी दिली आहे.  महर्षि शिंदे अध्यापक महाविद्यालात शुक्रवारी (दि.७) सकाळी साडे आकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पेपर सुरु झाल्यानंतर एक व्यक्ती संबधित महिलेला कॉपी पुरवित असल्याचे येथील काही कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी हा प्रकार प्राचार्यांच्या लक्षात आणून दिला . यादरम्यान संशयिताला पकडून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.परंतु, केंद्र प्रमुखांना याघटनेची माहिती दिली जात असताना संशयिता परीक्षा केंद्रातून पळ काढाला. परीक्षार्थी महिलेला कॉपी पुरविणारा संशयित पेठच्या कोटंबी येथील जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक असून परीक्षार्थी महिलेचा पती असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा नियंत्रकांनी परीक्षार्थी महिलेचा जप्त करण्याची कारवाई केली असून  सबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणी केंद्र प्रमुख आर. डी. बच्छाव यांच्याशी संपर्क साधला असता वरच्या मजल्यावर असल्याने आपल्याला उशीरा या प्रकाराची माहिती मिळाल्याचे सांगत परीक्षार्थी महिलेवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, झालेल्या प्रकार परीक्षा नियंत्रकांसमोर घडल्यानंतरही झालेल्या गोंधळानंतर संशयिताला महाविद्यालयातून पळ काढण्याची संधी मिळाल्याने महाविद्यालयातील परीक्षा यंत्रणेविषयीच साशंकता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालय