शिक्षक, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
By Admin | Updated: October 2, 2015 23:09 IST2015-10-02T23:07:46+5:302015-10-02T23:09:13+5:30
शिक्षक, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

शिक्षक, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
इंदिरानगर : प्राचार्य म.वि. अकोलकर मानसिक क्षमता संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्ताने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झाला.
यावेळी अपूर्वा खेडकर नंदा पेशकर, गजानन होडे, अस्मिता धोतरकर, विणा मुठाळ, सोमेश्वर मुळाणे, अंशुमती टोणपे, वंदना वाघमारे, अनिल ठाकरे, अलका वर्मा, विठ्ठल रहाणे, योगेश सूर्यवंशी, रोहिणी अचवल, वेदांत माळोदे, सार्थक कदम, अंकेत कोतकर, आदि विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर, संस्थेचे अध्यक्ष शंतनू गुणे उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील हिंगणे, अमृता कविश्वर यांनी केले, तर निशा नाखरे यांनी आभार मानले.