दोन महिन्यांपासून रखडले शिक्षकांचे वेतन

By Admin | Updated: October 11, 2015 22:05 IST2015-10-11T22:05:10+5:302015-10-11T22:05:38+5:30

कुचंबणा : सण-उत्सवाचा काळ

Teacher salary for two months | दोन महिन्यांपासून रखडले शिक्षकांचे वेतन

दोन महिन्यांपासून रखडले शिक्षकांचे वेतन

अभोणा : कळवण तालुक्यातील शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून रखडल्याने त्यांचे आर्थिक गणितच बिघडले आहे. त्यामुळे बहुतांशी शिक्षकांवर उसनवार पैसे घेण्याची वेळ आली आहे. आॅगस्ट महिन्यापासून शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे शिक्षक कुटुंब चालविताना मेटाकुटीला आला आहे. किराणा, विविध बँकांचे कर्ज हप्ते, मेडिकल, मुलांची विविध शैक्षणिक फी आदि सर्व बाबींचा विचार करता शिक्षक वर्गाची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.
शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याने बँकेकडून घेतलेल्या कर्जासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्याचप्रमाणे वेळवेर वेतन होत नसल्याने जीवन विम्याचे हप्तेही भरले जात नसल्याने संकटकाळी काहीही लाभ मिळणार नाही, अशी चिंता शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, आगामी सण उत्सवाच्या काळात पगार नसल्याने शिक्षक वर्गाची मोठी ससेहोलपट होणार असून, प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला नियमित पगार करण्यात यावे, अशी मागणी शिक्षकवर्गाकडून होत आहे.(वार्ताहर)

Web Title: Teacher salary for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.