राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत शिक्षिका माधुरी पवार विभागातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:26 PM2020-07-02T17:26:06+5:302020-07-02T17:26:43+5:30

औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका माधुरी पवार यांनी राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत प्राथमिक विभागातून प्रथम क्र मांक पटकविला.

Teacher Madhuri Pawar first in the state level online innovation competition | राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत शिक्षिका माधुरी पवार विभागातून प्रथम

राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत शिक्षिका माधुरी पवार विभागातून प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्दे इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढला

औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका माधुरी पवार यांनी राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत प्राथमिक विभागातून प्रथम क्र मांक पटकविला.
जीवनगौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद व शैक्षणिक मासिक जीवनगौरव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत प्रथम विभागातून शिक्षिका माधुरी पवार यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत इंग्लिश डिलीट गार्डन व कोरोना सुट्टीची सोबत विद्यार्थी होती ज्ञान समृद्ध या विषयात प्रथम क्र मांक मिळविला.
शिक्षकांना या उपक्र मास राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे यासाठी रामदास वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिका पवार यांनी राबविलेल्या या उपक्र मामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा वाचन लेखन समृद्ध करणे या मुळेआवड निर्माण झाली इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढला अ‍ॅक्शन वर्ड टेस्ट मॅच कॅम, स्कॅनर, ई लर्निंगयुक्त साहित्य कला कौशल्य विषयक मदत झाली व जनजागृती अभियानातून विद्यार्थी शिक्षक पालक यांचे प्रबोधन केले.
हा उपक्र म यशस्वीतेसाठी गट शिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, विस्तार अधिकारी विजय पगार, केंद्रप्रमुख डी. जे. काकळीज, मुख्याध्यापक दादा पगारे, रवींद्र पठाडे यांचे सहकार्य लाभले.
 

Web Title: Teacher Madhuri Pawar first in the state level online innovation competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.