शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १०३ शिक्षकांना टीचर इनोव्हेशन अ‍ॅवार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 16:50 IST

पेठ : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा टीचर इनोव्हेशन अ‍ॅवार्ड २०२० राज्यातील १०३ शिक्षकांना जाहीर झाला आहे.

ठळक मुद्दे सर फाऊंडेशन : नाशिक जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

पेठ : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा टीचर इनोव्हेशन अ‍ॅवार्ड २०२० राज्यातील १०३ शिक्षकांना जाहीर झाला आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे.शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार एज्युकेशन इनोव्हेशन बँक या प्रकल्पांतर्गत हे अ‍ॅवार्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणकि प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली जाते.या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कॉन्फरन्स’मध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणकि प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्र माची मेजवानी याठिकाणी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे.राज्यस्तरीय टीचर इनोव्हेशन अवार्ड विजेत्या शिक्षकांमध्ये प्राथमिक गटात नाशिकच्या सहा प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. सोपान खैरनार, जि प शाळा मोरेनगर सटाणा, वैशाली भामरे, जि प शाळा मानके व विशाल बोरस,े नवीन प्राथमिक शाळा भुईकोट किल्ला ता मालेगाव, ज्योती खैरनार, जि प शाळा शिवडे ता. सिन्नर, वैशाली सूर्यवंशी, जि प शाळा खालपफाटा व खंडू मोर,े जि प शाळा फांगदर देवळा, नितिन केवटे, तोरंगण ता. त्र्यंबकेश्वर येथील शासकीय आश्रमशाळा या शिक्षकांना जाहिर झाला आहे, असे सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ व हेमा शिंदे यांनी कळविले आहे.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डायट प्राचार्य डॉ वैशाली झनकर सर फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तसेच जिल्हाभरातील शिक्षकांनी कौतूक केले आहे. (६ फोटो ०३ नावाने केले आहे.)

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा