येवला : भारतीय संविधान हा विषय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधान मूल्य-विचार संवर्धन व प्रचारासाठी संविधान शाळा उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी अध्यापक भारतीच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.भारतीय संविधानाने आपणांस दिलेल्या लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता ह्या भारतीय संविधानिक मूल्यांची रुजवणूक आजच्या विद्यार्थी व भावी आदर्श नागरिकांकरता प्राथमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधान मूल्य-विचार संवर्धन व प्रचारासाठी संविधान शाळा उपक्रम सुरू करण्यात यावा, असे शरद शेजवळ यांनी सदर निवेदनात म्हटले आहे.भारतीय संविधान उद्देशिकेसह भारतीय संघ राज्य व त्याचे राज्य क्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्व, मूलभूत कर्तव्य, संघराज्य रचना व कार्य, भारतीय संसद अधिकार व कार्य, मंत्रिमंडळ, मंत्री परिषद, राष्ट्रपती, राज्यपाल यांचे वैधानिक अधिकार जबाबदार्या, न्यायमंडळ, पंचायती, नगरपालिका, सहकारी संस्था, वित्तव्यवस्था, मालमत्ता, महसूल रचना, व्यापारी, वाणिज्य व्यवहार, लोकसेवा आयोग, न्यायाधिकरण, निवडणुका, राजभाषा धोरण, संविधान सुधारणा आदी विषय अभ्यास कलमांचा अंतर्भाव विद्यार्थी वयोगटाप्रमाणे तयार करून भारतीय संविधानाची ओळख तथा राष्ट्रीय कर्तव्य व आचारण अधिकाराची जाणीव-संस्कार विद्यार्थ्यांना होण्याकरता संविधान शाळा हा उपक्रम सरकारने हाती घ्यावा, असेही निवेदनात यांनी म्हटले आहे.
संविधान शाळा उपक्रम शाळा-कॉलेजातून सुरू करण्याची अध्यापक भारतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:24 IST
येवला : भारतीय संविधान हा विषय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधान मूल्य-विचार संवर्धन व प्रचारासाठी संविधान शाळा उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी अध्यापक भारतीच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
संविधान शाळा उपक्रम शाळा-कॉलेजातून सुरू करण्याची अध्यापक भारतीची मागणी
ठळक मुद्देसंविधान मूल्य-विचार संवर्धन व प्रचारासाठी संविधान शाळा उपक्रम सुरू करण्यात यावा,