टाटिया यांना भारत ज्योती अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:11 IST2017-09-27T23:56:29+5:302017-09-28T00:11:22+5:30

आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व नाशिक जिल्हा जैन महासंघाचे महामंत्री दिलीपकुमार टाटिया यांना दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल फ्रेण्डशिप सोसायटीतर्फे नुकताच भारत ज्योती अवॉर्ड मिळाला. याबद्दल सटाणा शहर राजस्थानी परिवार व राजस्थानी सेवा मंडळ ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Tatya ji Bharat Jyoti Award | टाटिया यांना भारत ज्योती अवॉर्ड

टाटिया यांना भारत ज्योती अवॉर्ड

सटाणा : आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व नाशिक जिल्हा जैन महासंघाचे महामंत्री दिलीपकुमार टाटिया यांना दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल फ्रेण्डशिप सोसायटीतर्फे नुकताच भारत ज्योती अवॉर्ड मिळाला. याबद्दल सटाणा शहर राजस्थानी परिवार व राजस्थानी सेवा मंडळ ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिग्विजय शहा होते. राजस्थानी सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष व देवमामलेदार देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र भांगडिया यांच्या हस्ते टाटिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. शहा म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून टाटिया यांनी समाजकार्य केले आहे. समाजाची सेवा केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी बागलाणचे नाव उंचावले असून, युवा पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन शहा यांनी केले. कार्यक्रमास शांतिलाल राका, किशोर भांगडिया, नरेंद्र छाजेड, मनोज कोठारी, नेमीचंद बडजाते, अशोक गुलेचा, लखीचंद ओस्तवाल, प्रदीप सोनी, भिकचंद भांगडिया, चेतना छाजेड, अजित बागमार, नरेंद्र छाजेड, राजकुमार सोनी, मोहनकुमार छाजेड, अभय बुरड, राजेंद्र राका, राजेंद्र सोनवणे, रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते. राजकुमार सोनी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Tatya ji Bharat Jyoti Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.