शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:54 AM

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहर परिसरात विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहर परिसरात विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगूर येथील सावरकरांच्या जन्मस्मारकात त्यांच्या स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शहर, जिल्ह्यातील सावरकरप्रेमींनी हजेरी लावली. पुरातत्व विभागाच्या वतीने स्मारकात पूजन करण्यात आले.भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने भगूर येथील त्यांच्या जन्मभूमीला वंदन करण्यासाठी सकाळपासून स्मारकात सावरकरप्रेमींची गर्दी झाली होती. खासदार हेमंत गोडसे यांनी सावरकरांच्या प्रतिमेस वंदन करून पुष्पहार अर्पण केला. राज्यातील विविध भागांतून अनेकांनी भगूरला हजेरी लावली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि मित्रमंडळाच्या वतीने स्वा.वीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली.महाराष्टÑ शासनाचे पुरातत्व विभाग, सावरकर जन्मभूमी समिती तसेच भगूर नगरपालिका यांच्या वतीने भगूरमधील जन्मभूमी स्मारकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर जन्मभूमीला अभिवादन करण्यासाठी दिवसभर राज्यातील अनेक भागांतून सावरकरप्रेमी आले होते. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.तत्पूर्वी सकाळी भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने शासकीय पूजा करण्यात आली. याप्रसंगी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे, जया वहाणे, विजयकुमार धुमाळ, सोमनाथ गोराडे आदी उपस्थित होते. त्यानंतर चारु दत्त दीक्षित यांच्या बागेश्रीनिर्मित वाद्यवृंदाने सावरकरांच्या जीवनावरील कवितांचा कार्यक्र म सादर केला. भगूर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे नगरसेवक रघुनाथ साळवे संजय शिंदे, कविता यादव, अश्विनी साळव, जयश्री देशमुख आदी नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी चौकातील स्वा. वि. दा. सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले.वीर सावरकर उत्सव समिती, भगूरवीर सावरकर उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराज चौकात शिवसेना जिल्हा अध्यक्ष विजय करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते विविध मान्यवर यांचा सत्कार करून नूतन विद्यामंदिर व ति. झ. विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला.नाशिकरोडला अभिवादनस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त नाशिकरोड परिसरात विविध संस्थांच्या वतीने प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात  आले. भारतीय जनता पार्टी व मित्रमेळा  संस्थांच्या वतीने प्रतिमापूजनप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेविका सीमा ताजणे, अनिता सातभाई, नगरसेवक अंबादास पगारे, बाजीराव भागवत, राजेंद्र ताजणे, शांताराम घंटे, सुभाष घिया, कांता वराडे, शुभांगी रत्नपारखी, मुकुंद आढाव, शंकर साडे, शिवाजी उगले, भास्कर शेलार, सचिन सूर्यवंशी, रिंकू झनकर, अरु ण निरगुडे, मधुकर पाटील, नैयुम खान, नारायण नागरे, किशोर कानडे, भगवान मोर, बाळासाहेब दंडगव्हाळ, नंदू हांडे, सुजाता जोशी, पंडित रामशास्त्री, बल्लू ठाकूर, दिनकर झाडे, पप्पू रोजेकर, विनोद नाझरे आदी उपस्थित होते.सिन्नर फाटा येथील पत्रकार योगी स्वा. सावरकर वाचनालयात प्रतिमापूजनप्रसंगी वाचनालयाचे सचिव सतीश बागुल, प्रा. भरत खंदारे, अनिल अस्वले, ग्रंथपाल कल्पना वराडे, ओम उगले, तरुण महाराष्ट्र मित्रमंडळाचे सचिव अर्जुन दवते आदी उपस्थित होते.स्वातंत्र्यवीर सावरकर नागरी सह. पतसंस्थेमध्ये प्रतिमापूजन करताना संस्थेचे अध्यक्ष नंदू (गोविंद) गोखले संचालक श्रीमती शकुंतला करवा, संजय कोचरमुथा, जितेंद्र परदेशी, नंदा ढोले, विजय देशमुख, अनिल घोडके, कैलास कोरडे, सुभाष बैरागी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक