शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेती कर्जाचे लक्ष्य हजार कोटींनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:39 IST

नाशिक : दुष्काळ आणि नापिकीसारख्या दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी सातत्याने घसरणाऱ्या बाजारभावामुळे जेरीला आलेला असताना, आता पुन्हा खरिपाची तयारी करू लागला आहे. परंतु ऐन खरिपाच्या  तोंडावर भांडवलाची गरज असताना, जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित  लक्ष्यामध्ये सुमारे एक हजार कोटींची कपात केली आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा बँकेतून दीड हजार कोटींहून अधिक पीककर्जाची ...

नाशिक : दुष्काळ आणि नापिकीसारख्या दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी सातत्याने घसरणाऱ्या बाजारभावामुळे जेरीला आलेला असताना, आता पुन्हा खरिपाची तयारी करू लागला आहे. परंतु ऐन खरिपाच्या  तोंडावर भांडवलाची गरज असताना, जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित  लक्ष्यामध्ये सुमारे एक हजार कोटींची कपात केली आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा बँकेतून दीड हजार कोटींहून अधिक पीककर्जाची उचल झालेली असताना, जिल्हा बँकेने यावर्षी केवळ ५०० कोटींचे लक्ष्य ठेवून शेतकºयांच्या कर्जपुरवठ्यावर मर्यादा आणली असून, लक्ष्यच कमी ठेवल्याने कर्जाची परतफेड करूनही नव्याने कर्ज मिळेल की नाही, या साशंकतेने शेतकºयांकडून मागील थकीत कर्जाचा भरणा होण्याची शक्यताही कमी झाली आहे.  खरिपाच्या हंगामात अनेक शेतकरी जिल्हा बँकेचे तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून घेतलेले पीककर्ज जुने-नवे करून कर्ज खाते नियमित करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अनेकदा शेतकरी उसनवार अथवा नातेवाइकांकडून मदत मिळवून बँकेचे मुद्दल व व्याज भरून पुन्हा नव्याने कर्ज मिळाल्यानंतर त्याची परतफेड व वाढवून मिळालेल्या कर्जात खरिपाचा हंगाम कसाबसा भागविण्याचा प्रयत्न करतात. परंतु यावर्षी जिल्हा बँके ने कर्जपुरवठ्याचे निर्धारित लक्ष्यच अत्यल्प ठेवले आहे. त्यामुळे शेतकºयांनी कर्जाचा भरणा केल्यानंतरही त्यांना नव्याने कर्ज मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने शेतकरी थकीत कर्ज भरण्यास तयार होण्याची शक्यता घटली आहे. गेल्या वर्षीही अनेक शेतकºयांना कर्जाची परतफेड करूनही खरीप हंगामात शेतीसाठी पुरेसे कर्ज उपलब्ध होऊ शकले नव्हते. तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे जिल्हा बँकही अडचणीत सापडल्यामुळे अनेक शेतकºयांना त्यांच्या ठेवीही मिळू शकत नव्हत्या. त्यामुळे शेतकºयांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खरिपाच्या भांडवलासाठी वणवण करावी लागली होती. यावर्षी तर जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित लक्ष्यातच एक हजार कोटी रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांना खरिपाच्या हंगामात पुरेसा कर्जपुरवठा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरिपासाठी दोन हजार कोटींची गरजगेल्या काही वर्षांत शेतकºयांनी जिल्हा बँकेकडून खरिपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी उचललेल्या कर्जाची रक्कम पाहता यावर्षी शेतकºयांना किमान दोन हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे दिसून येते. २०१५-१६ या आर्थिक वर्षात शेतीसाठी खरीप रब्बी हंगामासाठी ११५० कोटींचे लक्ष्य असताना जिल्हाभरातील शेतकºयांकडून सुमारे १२९४ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल झाली होती, तर २०१६-१७ वर्षासाठी १५७४ कोटी क र्जपुरवठ्याचे लक्ष्य असताना जवळपास १७२० कोटींचे कर्ज उचलले गेले. अशाप्रकारे निर्धारित लक्ष्यापेक्षा कर्जाची मागणी दरवर्षी वाढतच असताना २०१७-१८ साठी निर्धारित लक्ष्य वाढण्याची अपेक्षा असतानाही त्यात कोणतीही वाढ झाली नाही. परंतु जिल्हा बँक नोटाबंदीमुळे अडचणीत आल्याने शेतकºयांना केवळ २१२ कोटी रुपयेच कर्जपुरवठा होऊ शकला होता. परंतु याच गोष्टीचा आधार घेऊन यावर्षी जिल्हा बँकेने पीक कर्जपुरवठ्याच्या लक्ष्यामध्ये तब्बल हजार कोटी रुपयांची कपात केली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी