बाजारसमिती उपसभापतीपदी ताराबाई माळेकर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST2021-02-12T04:14:28+5:302021-02-12T04:14:28+5:30
गुरुवारी सकाळी बाजार समिती कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली.सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुरुवारी ...

बाजारसमिती उपसभापतीपदी ताराबाई माळेकर बिनविरोध
गुरुवारी सकाळी बाजार समिती कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली.सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता तालुका उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी फय्याज मुलानी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. कृषी उत्पन्न बाजारसमितीत सभापती देवीदास पिंगळे यांचे वर्चस्व असल्याने सदर निवडणूक बिनविरोध होणार होती. त्यातच माळेकर पिंगळे गटाच्या असल्याने त्यांना उपसभापतिपद देण्याचे ठरले होते. त्यानुसार सदर पदासाठी माळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माळेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर माजी खासदार तथा सभापती देवीदास पिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रवींद्र भोये, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, शंकर धनवटे, प्रभाकर मुळाणे, संजय तुंगार, भाऊसाहेब खांडबहाले, संपत सकाळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, जगदीश अपसुंदे, शाम गावित, चंद्रकांत निकम, संदीप पाटील, विमल जुंद्रे, उपस्थित होते.
इन्फो====
कोरोना संसर्गामुळे मुदतवाढ
कोरोना प्रादुर्भावामुळे बाजार समितीची निवड प्रक्रिया लांबली होती. कोरोनामुळे सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने मुदतवाढ दिली होती. सध्या नाशिकमध्ये कोरोनाचे प्रमाण आटोक्यात असल्यामुळे निवड प्रक्रिया पार पडली.
(फोटो ११ बाजार)