निवाणे गावास तंटामुक्तीचा पाच लाखांचा पुरस्कार
By Admin | Updated: November 24, 2014 23:58 IST2014-11-24T23:54:05+5:302014-11-24T23:58:10+5:30
निवाणे गावास तंटामुक्तीचा पाच लाखांचा पुरस्कार

निवाणे गावास तंटामुक्तीचा पाच लाखांचा पुरस्कार
निवाणे : कळवण तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या व बहुचर्चेत असणाऱ्या अशा निवाणे गावाला तंटामुक्तीचा पाच लाखांचा पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्काराची माहिती मिळताच गावात फटाके फोडून आनंद व्यक्त केला असून, सदर पुरस्काराचे वितरण कळवण पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या हस्ते तंटामुक्तीचे अध्यक्ष कारभारी अहेर, पो. पाटील भालचंद्र अहेर, सरपंच बेबीताई सोनवणे, ग्रामविकास अधिकारी ए. बी. वाघ आदिंनी सदर धनादेश स्वीकारला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे होते, तर गटविकास अधिकारी मधुकर शिरसाठ, सभापती संगीता ठाकरे, उपसभापती संजय पवार, सहायक बी. डी. ओ. डी. एस. चित्ते, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सपकाळे, पो. निरीक्षक मधुकर गावित आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात कळवण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना तंटामुक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यात सर्वाधिक रकमेचा पुरस्कार निवाणे ग्रामपंचायतला मिळाला असून, तो पाच लाख रुपयांचा आहे, तर भुसणी दोन लाख, मानूर चार लाख, गणोरे तीन लाख, साकोरे दोन लाख, खर्डे दिगर चार लाख, ओतूर आठ लाख, नाळीद चार लाख, मोकभनगी तीन लाख आदि गावांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात निवाणे येथील सरपंच बेबीताई सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष कारभारी अहेर, पोलीसपाटील भालचंद्र अहेर, ग्रामपंचायत सदस्य देवीदास अहेर, संगीता मोरे, सौ. विमल अहेर, तंटामुक्ती सदस्य दादाजी अहेर, दत्तात्रेय अहेर, संगीता अहेर, नरेंद्र अहेर, पोपट अहेर, संजय अहेर, वसंत अहेर, किरण अहेर, महेश अहेर, ग्रामविकास अधिकारी ए. बी. वाघ, नानाजी माळी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.