सोनांबेत सरपंचाकडून स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:34+5:302021-06-01T04:11:34+5:30

सरपंच पदावर विराजमान होण्यापूर्वी गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात डाॅ. पवार यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून पाणी वाटप केले आहे. ...

Tanker water supply from Sonambit Sarpanch at his own cost | सोनांबेत सरपंचाकडून स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा

सोनांबेत सरपंचाकडून स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा

सरपंच पदावर विराजमान होण्यापूर्वी गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात डाॅ. पवार यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून पाणी वाटप केले आहे. रानात वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नसली तरी गावात मात्र नागरिक पाणी योजनेवर अवलंबून असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. ६ हजार लीटरच्या तीन टँकरमार्फत दररोज १८ हजार लीटर पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सरपंच पवार यांनी सांगितले. शरद रत्नाकर, उद्योजक टी. आर. पवार, बाबुराव बोडके, पोलीस पाटील चंद्रभान पवार, ह. भ. प. बाळासाहेब पवार, राजेंद्र पवार, सुदाम नवले यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून मोफत पाणी वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच संतोष डगळे, ग्रामपंचायत सदस्य योगेश पवार, भगवान पवार, सोमनाथ पवार, विकास पवार, शरद डगळे, माजी सरपंच संजय बोडके, तंटामुक्ती अध्यक्ष दामू बोडके, चेअरमन खंडेराव पवार, शंकर उगले, हरी पवार, नामदेव पवार, शांताराम घोडे, प्रकाश पवार, सुभाष जोर्वे, गणपत पवार आदींसह महिला उपस्थित होत्या.

फोटो - ३१ सोनांबे टँकर

सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथे टँकरने मोफत पाणी वाटपाचा शुभारंभ करताना शरद रत्नाकर, सरपंच डॉ. रवींद्र पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ.

===Photopath===

310521\31nsk_47_31052021_13.jpg

===Caption===

फोटो - ३१ सोनांबे टँकर सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथे टँकरने मोफत पाणी वाटपाचा शुभारंभ करताना शरद रत्नाकर, सरपंच डॉ. रवींद्र पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ. 

Web Title: Tanker water supply from Sonambit Sarpanch at his own cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.