शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साईभक्तांना टँकरची धडक; दोघांचा मृत्यू, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:33 IST

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून अनेक साईभक्त सध्या पदयात्रेने शिर्डीला जात आहेत. मुंबईतील इराणीवाडी, कांदिवली येथील साई कुटील मित्र मंडळाची पालखी घेऊन शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना शनिवारी (दि.२६) पहाटे टँकरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे साईभक्त ठार झाले तर जखमी झालेल्या चार साईभक्तांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान टँकरचालक फरार झाला असून घोटी सिन्नर महामार्गावर घोटीपासून ३ किमी अंतरावर देवळे गावाजवळ बंद पडलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला आहे.

ठळक मुद्देघोटी -सिन्नर मार्ग : देवळे गावाजवळ अपघात

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून अनेक साईभक्त सध्या पदयात्रेने शिर्डीला जात आहेत. मुंबईतील इराणीवाडी, कांदिवली येथील साई कुटील मित्र मंडळाची पालखी घेऊन शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना शनिवारी (दि.२६) पहाटे टँकरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे साईभक्त ठार झाले तर जखमी झालेल्या चार साईभक्तांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान टँकरचालक फरार झाला असून घोटी सिन्नर महामार्गावर घोटीपासून ३ किमी अंतरावर देवळे गावाजवळ बंद पडलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार या साईभक्तांची पालखी घोटीजवळ मुक्काम करून शनिवारी पहाटे शिर्डीकडे मार्गस्थ झाली होती. पालखी पुढे जात असताना जवळच बंद पडलेल्या पेट्रोलपंपापजवळ मागून येणाऱ्या टँकरने (क्रमांक एमएच ४६ / बीएफ ४५१४) पालखीतील साईभक्तांना जोराची धडक दिली. ही घटना लक्षात येताच अनेक साईभक्तांनी रस्त्याच्या कडेला उड्या घेतल्या तर अनेकजण धडकेमुळे गंभीर जखमी होऊन रस्त्यात पडून होते. यात राजकुमार राजेंद्र पटेल नामक साईभक्त जागीच ठार झाला तर अशोक अच्छेलाल गुप्ता हे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना मरण पावल्याचे वृत्त आहे.अज्ञात चालकांविरूद्ध गुन्हा दाखलअपघाताचे वृत्त समजताच मागून वाटचाल करणारे साईभक्त व महामार्गावरील वाहनचालकांनी धाव घेऊन जखमी भक्तांना घोटी ग्रामीण रुग्णलयात दाखल केले. त्यात अलोक गुप्ता, अनिकेत देसाई, आशिष कांजारीया, राहुल पाटील हे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घोटी पोलिसांनी गणेश लालजी सरोज रा. मालाड यांच्या फिर्यादीवरून अपघात करून फरार झालेल्या अज्ञात चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :saibabaसाईबाबाAccidentअपघात