केपानगर येथे टॅँकर चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 00:37 IST2016-04-11T22:54:39+5:302016-04-12T00:37:35+5:30

पाणी पेटले : सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

A tanker driver at Keepnagar beat | केपानगर येथे टॅँकर चालकाला मारहाण

केपानगर येथे टॅँकर चालकाला मारहाण

सिन्नर : तालुक्यातील केपानगर येथे पिण्याच्या पाण्याची टॅँकरची खेप घेऊन गेलेल्या पंचायत समितीच्या टॅँकरचालकास मारहाण झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केपानगरच्या सहा जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणला व दंगल घडवून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टॅँकरच्या फेऱ्यांवरून अनेक ठिकाणी तणाव निर्माण होत आहे. शिवाजी गंगाराम नागरे हे टॅँकरचालक त्यांच्या ताब्यातील टॅँकर (क्र. एमएच १५ एबी ०१४७) घेऊन केपानगर येथे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गेले होते. नागरे यांच्याकडे केपानगर गावासाठी दोन, तर मिठसागरे गावासाठी तीन खेपा आहेत. त्यामुळे सकाळीच साडेसहा वाजता ते केपानगरला पोहोचले.
केपानगर येथे सार्वजनिक पाण्याच्या टाकीत टॅँकर खाली केला जातो. नागरे टॅँकर घेऊन केपानगर येथे पोहोचल्यानंतर सरपंच संदीप कातकाडे व उपसरपंच त्यांच्याजवळ आले. गावातील शंकर मंदिरात धार्मिक कार्यक्रम असल्याने एक टीपभर पाणी या मंदिरात द्यावे, अशी विनंती त्यांनी नागरे यांना केली. त्यामुळे नागरे यांनी टॅँकर शंकर मंदिराकडे नेऊन टिपात पाणी टाकत असताना शरद लक्ष्मण घुगे त्यांच्याजवळ आला. या टिपात पाणी का खाली करता, असा जाब त्यांनी टॅँकरचालक नागरे यांना विचारला. घुगे यांनी टॅँकरची चावी काढून घेतली. तहसीलदार आल्याशिवाय टॅँकर हलवायचा नाही, असे म्हणत त्यांनी आजूबाजूचे लोक जमा केले. टॅँकरचालक नागरे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
(वार्ताहर)

Web Title: A tanker driver at Keepnagar beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.