नाना-महाराजांमध्ये ‘टशन
By Admin | Updated: February 12, 2017 00:42 IST2017-02-12T00:42:33+5:302017-02-12T00:42:44+5:30
नाना-महाराजांमध्ये ‘टशन

नाना-महाराजांमध्ये ‘टशन
’नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतील सिडको विभागात प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गात माकपाचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे आणि शिवसेनेचे उमेदवार दिलीप दातीर यांच्यात लढत होणार आहे. जायभावे हे दातीरांपेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. या भागात कामगार आणि कष्टकरी तसेच परप्रांतीय वर्ग मोठ्या प्रमाणात असून, त्यावर उभय उमेदवारांची मदार आहे. त्यामुळे या प्रभागातील दोघा तुल्यबळ उमेदवारांची लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. याच प्रभागातून भाजपाचे उखा चौधरी, कॉँग्रेसचे विठ्ठल विभुते, रासपाचे संजय गुंजाळ, धर्मराज्य पक्षाचे अनंत लोहार आणि अपक्ष मच्छिंद्रनाथ अहेर यांचाही निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये समावेश आहे.