नाना-महाराजांमध्ये ‘टशन
By Admin | Updated: February 11, 2017 00:22 IST2017-02-11T00:20:47+5:302017-02-11T00:22:30+5:30
नाना-महाराजांमध्ये ‘टशन

नाना-महाराजांमध्ये ‘टशन
’नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतील पूर्व विभागात प्रभाग क्रमांक १३ हा नाशिक शहरातील गाजलेल्या उमेदवारांमुळे चर्चित प्रभाग आहे. त्यात प्रभागातील ओबीसी जागेसाठी शिवसेनेकडून माजी महापौर अॅड. यतिन वाघ आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने गजानन शेलार हे आमने-सामने रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. अॅड. यतिन वाघ यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. आजोबा अॅड. यादवराव वाघ, वडील अॅड. रघुनाथअण्णा वाघ हे भूतपूर्व नगरपालिका काळात लोकप्रतिनिधी होते. अॅड. यतिन वाघ यांनी दहा वर्षे नगरसेवकपद तर मनसेचे माजी महापौरपद भूषविले आहे. गजानन शेलार सुरुवातीला कॉँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत दाखल झाले. दहा वर्षे नगरसेवकपद भूषवितानाच त्यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यपद भूषविले आहे.